१६ मार्चपासून बदलणारे ATM हे नियम माहिती आहेत का ?

१६ मार्चपासून बदलणारे ATM हे नियम माहिती आहेत का ?

मुंबई - ही बातमी नीट वाचा. बातमी तुमच्या आमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित ATM संबंधीत. आपल्या बँकेच्या खात्यांमधील पैसे सुरक्षित राहावे आणि ATM मधील व्यवहार अधिक सुकर आणि सोपे व्हावे म्हणून RBI ने नवीन नियमावली जारी केली आहे. नवीन नियमावलीअंतर्गत होणारे बदल असे असतील. 

१. आता तुम्हाला तुमच्या ATM मधून परदेशातून पैसे काढता येणार नाही,

२. बँकांकडून देण्यात येणारी ओव्हरसीजची सुविधा आता बंद करण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही फॉरेक्स कार्डचा वापर करू शकता. 

३. आता ग्राहकांना ऍपच्या किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून क्रेडिट कार्डाप्रमाणे तुमचं डेबिटकार्ड ऑन आणि ऑफ करता येऊ शकतं.      

४. आता तुमच्या ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये देखील बदल होऊ शकतात. अशा प्रकारची सुविधा बँकेकडून दिली जाणार आहे.   

५. दरम्यान, हे नवीन बदल गिफ्ट कार्ड किंवा प्रीपेड कार्डांवर लागू होणार नाही. 

या आधी SBI ने १ जानेवारीपासून ATM विड्रॉवल चे नियम बदलले होते. सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP चा वापर करावा लागतोय. दरम्यान येत्या १६ मार्चपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. 

new atm rules and guideline issued by RBI implementation will be done from march 16

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com