Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Thane Civil Hospital: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील नवीन १० मजली सिव्हिल हॉस्पिटलची पाहणी केली. हे रुग्णालय ठाणे आणि पालघरसाठी एक गेमचेंजर ठरणार आहे.
Thane Civil Hospital

Thane Civil Hospital

ESakal

Updated on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ठाण्याच्या टेंभी नाका परिसरात बांधण्यात येत असलेले ९०० खाटांचे नवीन सिव्हिल हॉस्पिटल आता अंतिम टप्प्यात आहे. उपमुख्यमंत्र्यांनी घोषित केले की, हे रुग्णालय केवळ ठाण्याच्या नागरिकांसाठीच नव्हे, तर शेजारच्या पालघर जिल्ह्यासाठीही 'वरदान' ठरेल. ठाणे शहरातील टेंभी नाका परिसरात बांधण्यात येत असलेले हे रुग्णालय एखाद्या खाजगी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयापेक्षा कमी नसेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com