मुंबईतील कोरोनाच्या नियंत्रणासाठी नव्या आयुक्तांची आक्रमक पावले! अधिकाऱ्यांमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप

मुंबईतील कोरोनाच्या नियंत्रणासाठी नव्या आयुक्तांची आक्रमक पावले! अधिकाऱ्यांमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप
Updated on


मुंबई : मुंबई महापालिकेतील पाच सनदी अधिकाऱ्यांसह तीन विशेष सनदी अधिकाऱ्यांना आज नवनियुक्त आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जबादाऱ्यांचे वाटप केले. यात कोरोनाच्या साथीवर नियंत्रणासह सामाजिक उत्तरदायित्वातून (सीएसआर) निधी मिळवणे, प्रतिबंधित क्षेत्राचे नियोजन, कामगारांच्या परतीसाठी समन्वय तसेच डायलिसीसची यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात आला आहे.

आयुक्त चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त म्हणून अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल यांची गेल्या आठवड्यात नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर सुरेश काकानी, पी.वेलारसू हे चार अतिरीक्त आयुक्त, तसेच आशुतोष सलील हे सहआयुक्त या पाच सनदी अधिकाऱ्यांसह मनिषा म्हैसकर, प्राजक्ता लवांगरे, डॉ. एन. रामास्वमी हे सनदी अधिकारी विशेष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्या सर्वांवर विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

मनीषा म्हैसकर 
रुग्णालयांमधील रुग्णांचे व्यवस्थापन करुन यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी नियोजन करणे, पालिका रुग्णालयातील खाटांच्या नियोजन, कोरोना काळजी केंद्र आणि रुग्णालयातील सेवा अधिक चांगल्या करण्याची जबाबदारी.
--
अश्विनी भिडे 
कोरोना आजाराशी लढण्याच्या कार्यपध्दतीत समन्वय ठेवण्याबरोबर रुग्णांचे संपर्क शोध, प्रतिबंधित विभागाचे व्यवस्थापन, संस्थात्मक विलगीकरण केंद्र, तसेच कोरोना काळजी केंद्र तयार करणे.
---
संजीव जयस्वाल 
अन्न आणि धान्य पुरवठा व वितरण, स्वयंसेवी संस्थांशी समन्वय, प्रतिबंधित क्षेत्रात धान्य पुरवठा, टाळेबंदी शिथिल करण्याबाबत धोरण ठरवणे, स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करणे. त्याचबरोबर कोरोनाबाबत सर्व पातळ्यांवर राज्य सरकारशी समन्वय ठेवणे.
---
प्राजक्ता लवंगारे- वर्मा 
कोरोना योद्धा योजनेत समन्वय करणे, पालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय यांच्या नेमणुका करणे, सेव्हन हिल्स रुग्णालयाची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करणे.
---
पी. वेलरासू
मान्सूनपूर्व कामे, नाले सफाई, उदंचन केंद्र, परदेशातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी, त्यांच्या विलगीकरणाची सोय, कोरोनासाठी लागणाऱ्या सर्व वैद्यकीय साधनांच्या पूर्ततेसाठी समन्वय राखणे.
---
सुरेश ककाणी
पालिकेची आरोग्य विभागाच्या संपूर्ण प्रशासनासह मुख्य रुग्णालये, उपनगरी रुग्णालये आणि दवाखाने यांचे व्यवस्थापन, वैद्यकीय महाविद्यालयांचे व्यवस्थापन, चाचण्यांची नियमावली पालन, कोरोना रुग्णांना घरी पाठवण्याबाबत नियमावलीची अंमलबजाणी 
---
डॉ. एन. रामस्वामी
सेव्हन हिल्स रुग्णालयाची क्षमता 1300 खाटांपर्यंत वाढवणे, त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित करणे, डायलिसिस सारख्या सुविधा देण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची नेमणुक करणे.
---
आशुतोष सलील
महा कोरोना काळजी केंद्र 2 आणि 3 ची  निर्मिती करणे, सुविधांची इत्यंभूत माहिती ठेवणे, कंपन्यांकडून सामाजिक बांधिलकी तत्वावर आर्थिक मदत व उपकरणे मिळवण्यासाठी समन्वय, कोरोनाशी संबंधीत संपूर्ण आकडेवारीचे व्यवस्थापन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com