

Mumbai-Goa Highway Work Update
ESakal
मुंबई : गेल्या १५ वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्प अखेर एका वळणावर पोहोचला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एक महत्त्वाचे विधान करताना महामार्गासाठी नवीन मुदत जाहीर केली. कोकण ते मुंबई प्रवास आता पूर्वीपेक्षा जलद आणि सोपा होईल. हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचा आढावा घेताना त्यांनी महामार्गाच्या पूर्णतेबद्दल स्पष्ट माहिती दिली.