esakal | मुंबईत ग्राहकांची धाव घर खरेदीकडे, घरांची मागणीही वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

Homes in mumbai

मुंबईत ग्राहकांची धाव घर खरेदीकडे, घरांची मागणीही वाढली

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : कोरोनाच्या सावटातून बांधकाम (Construction Section) क्षेत्र हळूहळू सावरू लागले आहे. गृहनिर्माण क्षेत्रात नवनवीन प्रकल्प (New Projects) आणि घरांच्या मागणी, खरेदीत वाढ होत चालली असून चालू वर्षातील जानेवारी ते जूनपर्यंतच्या कालावधीत घरांची मागणी (Home Demands) आणि नव्या प्रकल्पांमधून हाती येणाऱ्या घरांची संख्याही तब्बल 53 टक्क्यांनी वाढली आहे. ग्राहकांनी पश्चिम उपनगर (West Mumbai) आणि ठाणे शहरात (Thane) घर खरेदी करण्यास प्राधान्य दिले असल्याचे नाईट फ्रॅंक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. ( New Home Projects gets Demand in Mumbai And thane in covid situation-nss91)

गेल्यावर्षी कोरोनामुळे गृहनिर्माण क्षेत्रावर विपरित परिणाम झाला होता. एप्रिल 2020 मध्ये एकाही घराची खरेदी झालेली नव्हती. त्यानंतर राज्य सरकारने बांधकाम क्षेत्राला बळकटी देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात केल्याने नवीन प्रकल्प कार्यान्वित झाले. त्यानंतर सरकारने मुद्रांक शुल्काची सवलत बंद केल्यानंतरही घरांची खरेदी वाढत गेल्याचे आढळून आले आहे. त्याचा पडताळा ‘नाईट फ्रॅंक इंडिया’संस्थेच्या यंदाच्या सहामाहीतील घरांच्या मागणीतून प्रतिबिंबित झाले आहे. त्यासाठी मुंबईसह देशातील प्रमुख आठ शहरांचा त्यात समावेश केला आहे. त्यानुसार, मुंबई महानगर प्रदेशात गेल्या वर्षी जानेवारी ते जूनपर्यंत 18 हजार 646 घरांची खरेदी झाली होती. त्या तुलनेत यंदाच्या सहा महिन्यात घरांची खरेदी 28 हजार 607 एवढी नोंदविली गेली आहे.

हेही वाचा: Traffic Police: नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दणका, दीड कोटींचा दंड वसूल!

घरांच्या खरेदीप्रमाणे महानगर प्रदेशात नवीन गृहनिर्माण प्रकल्प कार्यान्वित होण्याचे प्रमाणही 53 टक्के वाढले आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात नवीन प्रकल्पातून 23,418 घरे उपलब्ध झाली. ती संख्या यंदाच्या सहा महिन्यात 35,872 घरे उपलब्ध झाली आहे. त्याचवेळी, घरांच्या किमतीही 2 टक्क्यांनी कमी झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात घरांच्या किमती प्रति चौरस फुटांमागे 6 हजार 886 रुपये असून यंदाच्या सहामाहीत ही रक्कम 6,750 रुपये प्रति चौरस फूट एवढी झाली.

पश्चिम उपनगरातील वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, सांताक्रूझ, विलेपार्ले, दहिसरमध्ये गतवर्षी पहिल्या सहामाहीत घर खरेदीत 13 टक्के वाढ होती. पण यंदाच्या पहिल्या सहामाहीत 19 टक्के वाढ नोंदविली गेली. तसेच, ठाण्यातील घरांच्या खरेदीत 2020 मधील 11 टक्क्यांच्या तुलनेत यंदा 15 टक्के वाढ झाली. तसेच, मध्य मुंबईत हे प्रमाण एक टक्क्यांनी वाढले आहे. नाईट फ्रॅंक इंडियाचे राष्ट्रीय संचालक आणि मुख्य अर्थशास्त्रज्ञ संशोधक रजनी सिंह यांनी यंदाच्या सहामाहीत घरांच्या मागणीत झालेली 53 टक्के वाढ ही सकारात्मक असल्याचे नमूद केले.

loading image