बीडीडी चाळीतील 260 रहिवाशांना नवी घरे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 February 2020

मुंबई : पुनर्विकासासाठी घरे स्थलांतरित केलेल्या ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळीतील 260 रहिवाशांसाठी म्हाडामार्फत 15 मार्चला काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये घरे दिली जावीत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या. ठाकरे यांच्या अध्यक्षतेत बीडीडी चाळीसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव अजोय मेहता, माजी मंत्री सचिन अहिर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महाविकासआघाडी सरकार 11 दिवसांत कोसळू शकतं - नारायण राणे

ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळीतील 800 पैकी 260 रहिवासी पहिल्या टप्प्यात संक्रमण शिबिरात स्थलांतरित झाले. उर्वरित रहिवाशांनी अद्यापही घरे रिकामी केली नाहीत. जे रहिवासी घरे रिकामी करून संक्रमण शिबिरात स्थलांतरित झाले, त्यांच्यासाठी सोडत काढून त्यांना करारासह नवी घरे द्यावीत. त्यामुळे उर्वरित रहिवाशांमध्येही विश्वास निर्माण होऊन ते पुनर्विकासासाठी घरे रिकामी करतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

चंद्रकांत पाटील यांच्या पीएच. डी वर; शरद पवारांचं जबरदस्त उत्तर 

बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प हा विशेष प्रकल्प म्हणून हाताळला जावा आणि कामाला गती देण्याची सूचना त्यांनी केल्या. बीडीडी चाळीतील रहिवाशांमध्ये जे शासकीय कर्मचारी आहेत, त्यांनाही संक्रमण शिबिरात स्थलांतरित करावे. त्यासाठी उप-जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसह स्वतंत्र यंत्रणा राबवावी. सर्व 800 रहिवाशी स्थलांतरित होताच पुनर्वसनाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळीप्रमाणेच नायगाव, शिवडी आणि वरळी येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला वेग द्यावा, टप्प्यांची निश्‍चिती करून तेथेही काम सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New homes for 260 residents of BDD Chawl