फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी नवी इम्युनोथेरपी गुणकारी

फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी नवी इम्युनोथेरपी गुणकारी

मुंबई: इम्युनोथेरपी वापरल्याने किंवा ती इतर उपचारांच्या बरोबर लागू केल्याने, रुग्णांमध्ये चांगली सुधारणा घडून आल्याचे काही क्लिनिकल अभ्यासांमध्ये नुकतेच दिसून आले आहे. त्यामुळेच फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या रुग्णांवर इम्युनोथेरपीचे इतर अनेक पर्याय वापरण्यास ‘एफडीए’ने मान्यता दिली आहे. इतकेच नव्हे, तर रुग्णांवर पारंपरीक उपचारांऐवजी इम्युनोथेरपी ही प्रथमस्थानी वापरण्यासही ‘एफडीए’ने मंजुरी दिली आहे.

एफडीएने फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांवरील उपचारांचा एक भाग म्हणून इम्युनोथेरपीला मान्यता दिली आहे. एखाद्या रुग्णाचा कर्करोग दूर करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी, त्याच्या स्वतःच्या रोगप्रतिकारक प्रणालीस मदत करणारा, इम्युनोथेरपी हा उपचारांचा एक विशेष प्रकार आहे. केवळ इम्युनोथेरपी वापरल्याने किंवा ती इतर उपचारांच्या बरोबर लागू केल्याने, रुग्णांमध्ये चांगली सुधारणा घडून आल्याचे काही क्लिनिकल अभ्यासांमध्ये नुकतेच दिसून आले आहे. त्यामुळेच फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या आणखी रुग्णांवर इम्युनोथेरपीचे इतर अनेक पर्याय वापरण्यास ‘एफडीए’ने मान्यता दिली आहे. इतकेच नव्हे, तर रुग्णांवर पारंपारिक उपचारांऐवजी इम्युनोथेरपी ही प्रथमस्थानी वापरण्यासही ‘एफडीए’ने मंजुरी दिल्याने याचा अनेक रुग्णांना फायदा होईल असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सूक्ष्मदर्शकावर ट्युमरच्या पेशी कोणत्या स्वरुपात दिसतात, त्याआधारे फुफ्फुसाच्या कर्करोगाची दोन प्रकारे विभागणी करण्यात येते ‘स्मॉल सेल’ आणि ‘नॉन-स्मॉल सेल’ फुफ्फुसांचा कर्करोग. हे दोन्ही कर्करोगाचे प्रकार वेगवेगळ्या उपचार पद्धतींमुळे वेगवेगळ्या मार्गांनी शरीरात पसरतात. आता आधुनिक संशोधनात त्यांचे अनेक उप-प्रकार दिसून आले आहेत. त्या प्रत्येकामध्ये नवीन रुपातील जनुके आणि विकृत स्वरुपातील प्रथिने आढळतात. या प्रत्येक उप-प्रकारांवर नवीन लक्ष्यित उपचारांचा वापर केला जाऊ शकतो असे अपोलो कॅन्सर सेंटरचे मेडिकल ऑन्कोलॉजी सल्लागार डॉ. सलील पाटकर यांनी सांगितले. 

फुफ्फुसाचा कर्करोग हा जगात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. इतर अनेक कर्करोगांच्या तुलनेत, या कर्करोगामध्ये मृत्यूदर सर्वात जास्त असल्याचे आढळून आले आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे एकदा निदान झाल्यावर, या रोगाचा किती प्रसार झाला हे शोधणे महत्वाचे असते. अशा वेळी, विशेषत: उच्च जोखीम असलेल्या व लक्षणे दिसत नसलेल्या व्यक्तींच्या नियमित चाचण्या करणे आवश्यक असते असे ही पाटकर पुढे म्हणाले. 

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

New Immunotherapy for Lung Cancer

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com