esakal | वय २३ वर्ष, हेडफोन्सने घेतला जीव..
sakal

बोलून बातमी शोधा

वय २३ वर्ष, हेडफोन्सने घेतला जीव..

वय २३ वर्ष, हेडफोन्सने घेतला जीव..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई, कल्याण : वारंवार सांगितलं जातं की रेल्वे स्टेशनवर मस्ती करू नका, ट्रेनमध्ये मस्ती करू नका, रेल्वे रूळ ओलांडू नका. पण ऐकतील ती लोकं कसली? कुणीही या गोष्टी अजिबात गांभीर्याने  घेत नाहीत. रोज आपल्याला समजतं ट्रेनमधून पडून अपघात झाला, कुणाचा हात रुळांशेजारच्या खांबाला लागून फ्रॅक्चर झाला. एक ना अनेक प्रकार..   

मोठी बातमी - 'मनसे'चा मोठा चेहरा आता येणार जनतेसमोर, मनसेत आनंदी आनंद...

अशीच एक दुर्दैवी घटना कल्याण रेल्वे स्थानकालगत असलेल्या सांगळेवाडी परिसरात घडलीये.  रेल्वे रुळ ओलांडताना लोकलची धडक लागल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. अंतूदेवी दुबे असे या तरुणीचे नाव आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे. दरम्यान सदर तरुणी हेडफोन्स कानाला लावून रूळ ओलांडत होती, ज्यामुळे तिला ट्रेनचा आवाज आला नाही आणि अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय अशी देखील माहिती सामोर येतेय.

मोठी बातमी - एक असा देश जिथे सुरु आहे २०१३ साल, इथे वर्षात आहेत १३ महिने..

मयत तरुणी याच परिसरातील लोक उद्यान गृहसंकुलातील राहत होती. कल्याण पूर्वेतील साकेत महाविद्यालयात जाण्यासाठी पश्चिमेकडील सांगळेवाडी परिसरातून ती कल्याण रेल्वे स्थानकाकडे जात होती. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या लोकलनी तिला धडक दिली. या अपघाताला रेल्वेचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

धक्कादायक -  ! ''तुमची पेटीएम सेवा २४ तासात बंद होईल, आधी नमूद केलेल्या नंबरवर फोन करा''

येथील वहिवाटीचा पर्यायी रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे. परंतु रुळांलगत असलेल्या संरक्षण भिंतीचे काम अर्धवट स्थितीत असल्याने रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी सांगळेवाडी परिसरातून रुळांवरुन नागरिक प्रवास करतात. आठ दिवसांपूर्वी याच ठिकाणी असाच एक अपघात झाल्याची माहिती पुढे येत आहे.

WebTitle : twenty three years old girl lost her life due to headphones

loading image
go to top