मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

Thane Mulund new railway station: ठाणे आणि मुलुंड यांच्या दरम्यानच्या एका नवीन रेल्वे स्थानकाला २५० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या स्थानकाला 'धर्मवीर आनंद दिघे' यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.
Thane-Mulund new railway station

Thane-Mulund new railway station

ESakal

Updated on

ठाणे : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. ठाणे आणि मुलुंड यांच्या दरम्यानच्या अत्यंत वर्दळीच्या रेल्वे मार्गावर एका नवीन रेल्वे स्थानकाच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या नवीन स्थानकाच्या बांधकामासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी २५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असल्याची घोषणा शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com