
ठाणे : घोडबंदर मार्ग हा नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे आणि गुजरात मधील महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे रोज हजारोंच्या संख्येने या मार्गावरून जेएनपीटी बंदरामधून मालवाहू जड अवजड वाहनांची वाहतूक होते. येथील दळणवळणाचा वेग पाहता घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरि वसाहती तयार झाल्या आहेत. येथील झपाट्याने झालेला विकास पाहता नवे ठाणे म्हणून घोडबंदरकडे पाहिले जाते.