Mumbai News : नवीन वर्षाच्या स्वागत करताना ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या 229 तळीरामावर पोलिसांकडून कारवाई

मुंबई पोलिसांनी नवीन वर्षाच्या स्वागत करताना ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या 229 तळीरामावर कारवाई केली आहे.तर 80 जणांवर बेशिस्तपणे वाहन चालवल्याबद्दल कारवाई करण्यात आली.
Drink & Drive Crime
Drink & Drive Crimeesakal

मुंबई - मुंबई पोलिसांनी नवीन वर्षाच्या स्वागत करताना ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या 229 तळीरामावर कारवाई केली आहे.तर 80 जणांवर बेशिस्तपणे वाहन चालवल्याबद्दल कारवाई करण्यात आली. तसेच हेल्मेट न वापरता मोटारसायकल चालवल्याबद्दल 2410 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

31 डिसेंबरला नागरिकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी रविवारी रात्री उशिरा ते सोमवारी पहाटेपर्यंत वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. नियम न पाळणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध रस्त्यांवर चेक पॉईंट उभारले होते.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदोबस्ता दरम्यान सर्व पोलीस ठाणे हद्दीत 112 ठिकाणी विशेष नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकुण 9025 दुचाकी / तीनचाकी चार चाकी व इतर वाहानांची तपासणी करण्यात आली. सदर तपासणी दरम्यान विरूध्द दिशेने वाहन चालवणाऱ्या एकुण 320 चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच हेल्मेट न घालता मोटारसायकल चालवल्याबद्दल 2410 दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली.

ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या 229 तळीरामावर कारवाई केली आहे.तर 80 जणांवर बेशिस्तपणे वाहन चालवल्याबद्दल कारवाई करण्यात आली. दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास केल्याबद्दल 274 चालकांना चालान देण्यात आली. ट्रॅफिक सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 679 वाहनचालकांवरही पोलिसांनी कारवाई केली.

पोलीस फौजफाटा

राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पोलीस आणि क्विक रिअॅक्शन टीम (क्यूआरटी) यांच्यासह 12000 हून अधिक पोलीस कर्मचारी महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केले गेले. या मध्ये 11500 पोलीस हवालदार, 2051 अधिकारी, 22 पोलीस उपायुक्त ,45 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 7 अतिरिक्त पोलीस आयुक्त सुरक्षा तैनातीचा भाग होते.

याशिवाय, 46 राज्य राखीव पोलीस दल प्लाटून, 3 दंगल नियंत्रण पोलिस तुकड्या आणि 15 क्यूआरटी तुकड्या देखील तैनात केल्या होत्या. सुरळीत वाहतुक व्यवस्थापनासाठी 31 डिसेंबर रोजी अतिरिक्त वाहतूक पोलिसही ड्युटीवर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com