‘नाईट लाईफ’वर कारवाईचा दट्ट्या, मुंबईतील नाईट क्लब्स पालिकेच्या रडारवर

‘नाईट लाईफ’वर कारवाईचा दट्ट्या, मुंबईतील नाईट क्लब्स पालिकेच्या रडारवर
Updated on

मुंबई, ता.10 : कोविडमुळे कोणत्याही कार्यक्रमाला फक्त 50 व्यक्तींना जमण्याची परवानगी असली तरी नाईट क्लबमध्ये हजाराेने गर्दी जमत आहे. महानगर पालिकेने लोअर परळ आणि वांद्रे येथील क्लबवर धाडी टाकून ‘नाईट लाईफ’वर कारवाई केली आहे. लोअर परळ येथील अपिटोम आणि वांद्रे येथील क्लब विरोधात महापालिकेने स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही परीस्थीती पाहून महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी रात्रीच्या वेळी जमावबंदी लागू करण्याची शिफारस राज्य सरकारला केली आहे. नागरीकांच्या वागणुकीत सुधारणा न झाल्यास रात्रीची जमावबंदी लावण्या शिवाय पर्यायच राहाणार नाही असे संकेतच आयुक्तांनी दिले आहे.

महापालिकेचे पथक या क्लबमध्ये पोहचले तेव्हा तेथे किमान दोन अडीज लोकं जमली होती. तर, पालिकेचे पथक येत असल्याची कुणकुण लागताच काही जणं बाहेरही निघुन गेलेत. क्लबमध्ये कोविडच्या सर्व नियमावलीचे उल्लंघन होत होते. मास्कही लावला नव्हता, असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. मागील आठवड्यात झालेल्या याकारवाईत आयुक्तांनी सर्व प्रभागातील सहाय्यक आयुक्तांच्या त्यांच्या प्रभागातील नाईट क्लबवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, असेही आयुक्तांनी सांगितले. लोअर परळ येथील नाईट क्लब मध्ये असलेल्या 450 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारानंतर रात्रीच्या वेळी जमाव बंदी लागू करावी अशी विनंती राज्य सरकारला पत्र पाठवून केली आहे. सरकारनेही पत्राची दखल घेतली असून पुढील 15 दिवसाच्या कोविड परीस्थीतीचा आढावा घेऊन रात्रीच्या जमाव बंदी बाबत निर्णय घेण्यात येईल असे राज्य सरकारने सांगितले. हे क्लब पाहाटेपर्यंत सुरु असतात. त्यामुळे रात्री 11 वाजल्यानंतर क्लब बंद करण्यात यावी अशी सुचनाही आयुक्तांनी केली आहे.

तर दुसरी लाट कधीही येईल

सर्वांच्या प्रयत्नांने कोविडवर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश आले आहे. मात्र, कोविड अजून संपुर्ण संपलेला नाही.नाईट क्लब सारखी परीस्थीती असल्यास कोविडची दुसरी लाट कधीही येऊ शकते.ती आगी सारखी पसरेल.असेही पालिकेकडून सांगण्यात आले.नागरीकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.असे आवाहन आयुक्त इक्बाल सिंह यांनी केले.

( संपादन - सुमित बागुल )

night clubs of mumbai on the radar of BMC as no covid code of conducts are observed

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com