
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर जोरदा निशाणा साधलाय. थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जरांगे सातत्यानं टीका करतात. याशिवाय जरांगे पाटील यांनी आज मंत्री नितेश राणे यांच्यावरही टीका केली. या टीकेला नितेश राणेंचे बंधू आमदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. जरांगेंनी वैयक्तिक टीका करू नये असा सल्ला निलेश राणे यांनी दिलाय. मनोज जरांगे पाटील यांनी नितेश राणे यांना चिचुंद्री म्हणत टीका केली होती. नितेश राणेंनी मनोज जरांगे यांनीच हिंदूंमध्ये फूट पाडली असा आरोप केला होता. तर जरांगेंच्या आंदोलनाला रोहित पवार रसद पुरवतायत असाही आरोक राणेंकडून करण्यात आला होता.