

Nirmala Niketan to Host International Conference on Sustainability
Sakal
मुंबई : हवामान आणि होत असलेले पर्यावरणीय बदल, देशातील नागरीकांचे आरोग्य, सर्वसामान्य नागरीकांच्या उपजीविकेपासून ते शाश्वत उपजीविका, तसेच मानव आणि पर्यावरण यांच्यातील बदलत्या नातेसंबंधांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारमंथन करण्यासाठी कॉलेज ऑफ होम सायन्स, निर्मला निकेतन (स्वायत्त) संस्थेत दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. ही परिषद १६ आणि १७ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत होणार असल्याची माहिती कॉलेज ऑफ होम सायन्स, निर्मला निकेतनच्या प्राचार्या डॉ. आशा मॅथ्यू यांनी दिली.