Navi Mumbai: सहा कोटींचा भार! वेतनवाढीचा पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण

NMMC: नवी मुंबई पालिका आणि एनएमएमटीने महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ केली आहे. यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
navi mumbai municipal corporation

navi mumbai municipal corporation

ESakal

Updated on: 

नवी मुंबई : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पालिका आणि एनएमएमटीने हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. महापालिकेच्या आठ हजार ९९ कंत्राटी कामगारांच्या वेतनात थेट सात हजार ५०० रुपयांची वाढ केली आहे. याच घर्तीवर एनएमएमटीमधील ठोक (कंत्राटी) कर्मचाऱ्यांनाही सात हजार रुपयांची वेतनवाढ जाहीर केली आहे. कामगारांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण असले तरी, या राजकीय निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर मात्र दरमहा आणि वार्षिक कोट्यवधी रुपयांचा प्रचंड आर्थिक बोजा पडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com