

Navi Mumbai municipal corporation
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वाशी येथे प्रभाग क्रमांक १७ मधून बाद झालेल्या भाजपचे उमेदवार ॲड. नीलेश भोजने यांना पुन्हा लढण्याची संधी मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भोजने यांचा दावा मान्य करीत त्यांच्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने केलेली कारवाई अमान्य केली आहे; परंतु यादरम्यान भाजपने अपक्ष उमेदवार दर्शन भोईर यांना पाठिंबा जाहीर करीत प्रचार सुरू झाल्याने गोंधळ उडाला आहे.