esakal | एनएमएमटी कामगार वेतनवाढीच्या प्रतीक्षेत
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

एनएमएमटी कामगार वेतनवाढीच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबई (navi Mumbai) महापालिकेच्या परिवहन उपक्रमात कार्यरत असणाऱ्या कामगारांचे तब्बल ३३ महिन्यांची वेतनवाढ रखडली आहे. सरकारने आदेश दिल्यानंतरही २०१५ पासून वाढलेल्या वेतनातील फरकाची रक्कम अद्याप अदा करण्यात आलेली नाही. याप्रकरणी कामगारांच्या प्रश्नांबाबत इंटकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत (Sawant) यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी एनएमएमटीचे (NMMT) व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांची भेट घेत आंदोलनाचा इशारा दिला.

२०१५ पासूनची ३३ महिन्यांची थकबाकी देण्यात यावी. प्रशासनातील अन्य कामगारांना ही थकबाकी मिळालेली आहे. तथापि परिवहनच्या कर्मचाऱ्यांना यापासून का वंचित ठेवण्यात आले आहे, असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. कामगारांना जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२१ पर्यंतच्या वाढीव महागाई भत्याच्या फरकाची रक्कम देण्यात यावी. २०२१पासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मासिक भत्त्यात ४५५ रुपये वाढ झाली आहे, ती देण्यात यावी. परिवहन विभागातील सफाई कामगारांना कोविड भत्ता देण्यात यावा. कोरोनाकाळात एनएमएमटीच्या बसचे रुग्णवाहिकांमध्ये रूपांतर केल्यानंतर त्यांनी रोज त्या बसची स्वच्छता व सफाई कोरोनाकाळात कोणतीही तक्रार न करता केली आहेत.

हेही वाचा: सिडको वाळूज महानगर येणार महापालिकेत!अभ्यासासाठी संयुक्त समिती

सिडको व म्हाडाकडून देण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी आवश्यक असणारे कोरोनायोद्धा प्रमाणपत्र या कामगारांना देण्यात यावे. गणवेश शिलाईचे पैसे प्रशासनाने येत्या पगारात द्यावेत. तसेच, यापुढे गणवेशचा कापड आणि शिलाईचे पैसे परिवहनकडूनच देण्यात यावे. १ सप्टेंबर २०२० ते ३१ ऑगस्टपर्यंतचा दिवाळी बोनस आणि पगार दिवाळीआधी कामगारांना देण्यात यावा, अशा मागण्या सावंत यांनी कडूस्कर यांच्याकडे केल्या आहेत.

loading image
go to top