शिवसेनेसोबत पुन्हा हातमिळवणीची इच्छा नाही; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

तुषार सोनवणे
Monday, 28 September 2020

शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा युती करणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागला. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी आज महत्वपुर्ण विधान केले आहे.

मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी मुंबईत भेट झाली.  शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास उभय नेत्यांमध्ये ही भेट झाली. या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. तसंच अनेक चर्चांही रंगू लागल्या. त्यात शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा युती करणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागला. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी आज महत्वपुर्ण विधान केले आहे.

कॉंग्रेसच्या बड्या नेत्याला कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन

राज्यात महाविकास आघाडी  समोर अडचणींचा मोठा डोंगर उभा आहे. अशातच राज्यातील भाजपने सत्ताधाऱ्यांविरोधात टीकेचा सूर तीव्र केला आहे. त्यातच राऊत आणि फडणवीसांमध्ये झालेल्या बैठकीबाबत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच फडणवीस यांनी पुन्हा शिवसेनेसोबत पुन्हा हातमिळवणी करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट  केले आहे. राऊत यांच्याशी झालेली भेट ही राजकीय नसल्याचेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. ती भेट दै. सामनाच्या मुलाखती संदर्भात असल्याचे त्यांनी आधी स्पष्ट केले आहे. 

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही सह्याद्री वाहिनीवर कार्यक्रम; लवकरच वेळापत्रक होणार जाहीर

कॉंग्रेसमधील संजय निरूपम यांनी संजय राऊच यांच्यावर खोचक टीका केली होती. तर इतर कॉ़ंग्रेस नेत्यांनी त्या भेटीबाबत काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे जेष्ट नेते माजिद मेनन यांनीही सत्तेत फक्त शिवसेना एकटी नसल्याची आठवण राऊतांना करून दिली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही वर्षा बंगल्यावर भेट झाली. त्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना चांगलेच उधान आले होते. दरम्यान, भाजपचे माजी खासदार शिवाजी करडीले यांनी राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार असे भाकित व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

No desire to shake hands with Shiv Sena again Devendra Fadnavis reaction


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No desire to shake hands with Shiv Sena again Devendra Fadnavis reaction