सुशांतच्या बॅंक खात्यातून कोणताही गैरव्यवहार नाही; फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालातून स्पष्ट 

राजू परुळेकर
Wednesday, 19 August 2020

अभिनेता सुशांतसिंह याच्या बॅंक खात्यातून रिया चक्रवर्तीच्या खात्यात कुठलाही व्यवहार झाला नसल्याचे फॉरेन्सिक ऑडिटच्या (न्यायवैद्यक लेखापरीक्षण) अहवालातून स्पष्ट झाले आहे. सुशांतच्या बॅंक खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम वळवल्याचे आरोप करण्यात आले होते. या आरोपामुळे मुंबई पोलिसांनी सुशांतच्या सर्व व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट केले होते.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह याच्या बॅंक खात्यातून रिया चक्रवर्तीच्या खात्यात कुठलाही व्यवहार झाला नसल्याचे फॉरेन्सिक ऑडिटच्या (न्यायवैद्यक लेखापरीक्षण) अहवालातून स्पष्ट झाले आहे.

सुशांतच्या बॅंक खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम वळवल्याचे आरोप करण्यात आले होते. या आरोपामुळे मुंबई पोलिसांनी सुशांतच्या सर्व व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट केले होते. सोमवारी (ता. 17) हा अहवाल वांद्रे पोलिसांकडे सोपवण्यात आला. या अहवालामध्ये सुशांतच्या खात्यातून कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

क्लिक करा : रिया चक्रवर्तीच्या लिगल टीमचा नवीन जबाब; सुशांतच्या बहिणीवर केले आरोप

अभिनेता सुशांतसिंहने 14 जूनला आत्महत्या केल्यानंतर त्याच्या तीन बॅंक खात्यातून मोठ्या प्रमाणावर रक्कम इतर खात्यात वळवल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी सुशांतच्या वडिलांनी पाटण्याच्या (बिहार) राजीव नगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल केली होती.

सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीत सुशांतच्या खात्यातून पैसै काढल्याचा आरोप करण्यात आला होता. यात सुशांतच्या बहिणींनी रिया चक्रवर्तीवर संशय व्यक्त केला. त्यानंतर बिहार पोलिसांच्या पथकाने मुंबईत येऊन बॅंक खात्यांची चौकशी केली होती. ईडीने या व्यवहाराची चौकशी सुरू केली आहे. 

नक्की वाचा : सुशांतच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेल्या मिस्ट्री गर्लचा झाला खुलासा

या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप वाढल्याने मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आर्थिक व्यवहाराच्या तपासासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक केली होती. यामध्ये सुशांतच्या करिअरच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात आली.

क्लिक करा : श्रीलंकन ब्युटी जॅकलीन महाराष्ट्राच्या प्रेमात; पालघरमधील दोन गावे घेतली दत्तक

मात्र तपासात कुठलेही आक्षेपार्ह व्यवहार झाल्याचे आढळून आले नाही. कामगारांचे वेतन, घरभाडे आणि इतर खर्चाचा तपशील या अहवालामध्ये देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No fraud from Sushant's bank account; Clearification from the forensic audit report