MSEDCL : पैसे भरूनही मीटर कनेक्शन नाही ..आमदार गणपत गायकवाड महावितरण अधिकाऱ्यांवर भडकले

कल्याण पूर्वेतील आशेळे गावातील नागरिक सहा महिन्यांपासून अंधारात
No meter connection even after paying money MLA Ganpat Gaikwad raged on Mahavitran officials mumbai
No meter connection even after paying money MLA Ganpat Gaikwad raged on Mahavitran officials mumbaisakal

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील आशेळे गावातील काही विकासकांवर वीजचोरी प्रकरणी महावितरणच्या वतीने कारवाई करण्यात आली होती. या कारवाईला सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे.

नागरिकांनी विजेसाठी महावीतरणकडे पैसे भरणा करूनही त्यांना अद्याप मीटर चे कनेक्शन मिळाले नाही. त्यामुळे येथील नागरिक सहा महिन्यांपासून अंधारात रहात असल्याने आमदार गणपत गायकवाड यांनी याचा जाब महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारत त्यांना फैलावर घेतले.

आमदार भडकताच अधिकाऱ्यांनी आमच्याकडून चूक झाली असे म्हणत तात्काळ नागरिकांना मीटर कनेक्शन देण्यात येईल अशी नरमाईची भूमिका घेतली. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असून महावितरणच्या वतीने या भागात वीज चोरी विरोधात कारवाई करण्यात येते.

अनेकदा तर कारवाईसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ले झाले आहेत. महावितरणच्या वतीने वीजचोरी करणाऱ्या गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे गुन्हे दाखल होऊन नंतर न्यायालयात ते सुनावणीला जातात.

याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. कल्याण पूर्वेतील आशेळे गावात देखील नागरिकांना याचा फटका बसला आहे. आशेळे येथील काही इमारतींचा वीज पुरवठा सहा महिन्यांपूर्वी खंडित करण्यात आला आहे.

वीज चोरी प्रकरणी विकासका विरोधात महावितरणने कारवाई केली आहे. मात्र त्यानंतर येथील नागरिकांना पुन्हा मीटर कनेक्शन महावितरणकडून देण्यात आलेले नाही. सहा महिन्यांपासून येथील नागरिक अंधारात रहात असल्याने आमदार गणपत गायकवाड महावितरण अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापल्याचे दिसून आले. गुरुवारी आमदार गायकवाड यांनी त्या परिसरात जाऊन पहाणी केली. यावेळी महावितरण अधिकारी देखील उपस्थित होते.

विकासकवर गुन्हा दाखल होऊन किती दिवस झाले. त्यानंतर येथील नागरिकांना वीज द्यायची नाही असे काही आहे का ? असा प्रश्न आमदारांनी अधिकाऱ्यांना विचारला. वीज चोरीची कारवाई सुरू असल्याने विलंब झाला, आमची चूक झाली. तातडीने याची चौकशी करून मीटर कनेक्शन देण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगत नरमाईची भूमिका घेतली.

जोपर्यंत वीज पुरवठा केला जात नाही तोपर्यंत येथून जाणार नाही अशी भूमिका आमदार गायकवाड यांनी घेतली. यापूर्वी अनेक भागात वीज चोरी होते. टेबल खालून पैसे मिळाले की मीटर कनेक्शन दिले जाते.

कायदेशीर रित्या पैसे भरलेल्यांना मीटर दिले जात नाही असा गंभीर आरोप महावितरण अधिकाऱ्यांवर त्यांनी यावेळी केला. महावितरणचे अधिकारी कसे भ्रष्ट आहेत. त्यांचे कामकाज कसे चालते याचा खुलासा देखील त्यांनी अधिकाऱ्यांसमोर केला.

याबाबत महावितरण अधिकाऱ्यांनी सावध पवित्र घेत याची चौकशी केली जाईल व या इमारतीतील रहिवाशांना तत्काळ वीज कनेक्शन दिले जाईल असे सांगितले त्या नंतर आमदारांनी माघार घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com