भुजबळ म्हणतात शिवभोजन थाळीसाठी आधारकार्डची सक्ती नाही, मात्र..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

मुंबई : आज सकाळपासून चर्च होती ती दहा रुपयांची शिवभोजन थाळी आणि त्यासंबंधीच्या आधार सक्तीची. 26 जानेवारी रोजी दहा रुपयातील शिवभोजन थाळी गरीब आणि गरजू लोकसांसाठी सुरु करण्यात येणार आहे. अशात दहा रुप्याच्या थाळीसाठी आधार आणि फोटो सक्ती करण्यात आल्याचं बोललं जात होतं. यावरून काही राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या. याबद्दल आता मंत्री छगन भुजबळ यांनी याबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलंय.   

"दहा रुपयांच्या शिवभोजन थाळीसाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. शिवभोजन केंद्रावर फर्स्ट काम फर्स्ट सर्व्ह म्हणजेच  प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिवभोजन योजनेचा लाभ देण्यात येईल", अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मोठी बातमी - 'ते' आधी निर्जनस्थळी न्यायचे; मग करायचे...

याबद्दल बोलताना छगन भुजबक भुजबळ म्हणाले, या योजनेंतर्गत सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी आणि महानगरपालिका क्षेत्रात किमान 1 भोजनालय सुरु करणार आहे.  हे भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असेल. ही भोजनालये दुपारी 12.00 ते 2.00 या कालावधीत कार्यरत राहतील. या भोजनालयात दुपारी 12.00 ते 2.00 या कालावधीत या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय चालकाची आहे.

मोठी बातमी - आलियाच्या आईचं अफझल गुरूबद्द वादग्रस्त वक्तव्य, सोनी राजदान म्हणतात.. 

दरम्यान यासाठी भोजनालय चालविण्यासाठी या मालकाकडे स्वत:ची पर्याप्त जागा असावी. भोजनालयात एका वेळी किमान 25 व्यक्तींची जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असेल. एका भोजनालयात किमान 75 आणि कमाल 150 थाळी भोजन उपलब्ध होणार आहे. या भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.

no need of aadhar card for getting 10 rs shivbhojan thali says chagan bhujbal 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no need of aadhar card for getting 10 rs shivbhojan thali says chagan bhujbal