आलियाच्या आईचं अफझल गुरूबद्द वादग्रस्त वक्तव्य, सोनी राजदान म्हणतात.. 

आलियाच्या आईचं अफझल गुरूबद्द वादग्रस्त वक्तव्य, सोनी राजदान म्हणतात.. 

मुंबई - आलिया भट्टची आई आणि ८० च्या दशकातील बॉलीवूडची अभिनेत्री सोनी राजदान यांनी अफजल गुरूला दिलेल्या फाशीबद्दल आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केलं आहे. हे ट्विट आता वादाच्या भोवऱ्यात अडकताना पाहायला मिळतंय. संसदेवरील झालेल्या हल्ल्यामध्ये अफजल गुरूला 'बळीचा बकरा' बनवण्यात आलं असं सोनी राजदान यांनी केलाय. जम्मू काश्मीरचे निलंबित पोलिस उपअधीक्षक दविंदर सिंह यांच्या अटकेनंतर सोनी राजदान आणि महेश भट्ट यांनी ट्विटरवरून आक्षेप घेतला आहे.

सोनी राजदान यांनी अफजल गुरूच्या पत्राचा काही भाग शेअर केला आहे. डीवायएसपी दविंदर सिंह यांनी माझा छळ केला होता आणि त्याच्यासाठी मला एक छोटंसं काम करावं लागेल असं अफझल गुरु यानी सांगितल्याचा या पत्रात उल्लेख आहे.

काही दिवसांपूर्वी दोन दहशतवाद्यांसोबत सापडल्यामुळे डीवायएसपी दविंदर सिंह यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. अफझल गुरुने तिहार तुरुंगातून वकील सुशील कुमार लिहिलेल्या पत्रात दविंदर सिंह यांच्याबद्दल लिहिलं होतं. त्यानंतर डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर दहशतवादी हल्ला केल्याच्या प्रकरणात अफझल गुरुला ९ फेब्रुवारी २०१३ ला फाशीची शिक्षा देण्यात आली होती.

This is a travesty of justice. Who is going to bring back a man from the dead if he is innocent. This is why the death penalty is not to be used lightly. And this is why there also needs to be a solid enquiry into why Afzal Guru was made the scapegoat https://t.co/UUVV2Z9UGU

— Soni Razdan (@Soni_Razdan) January 21, 2020

"ही न्यायाची खिल्ली उडवली गेली आहे. एखादा माणूस निर्दोष सिद्ध झाला, तर त्याचा जीव परत कसा आणणार? हा मोठा प्रश्न आहे. म्हणूनच मृत्यूदंड इतक्या सहजतेने वापरला जाऊ नये. अफजल गुरुला ‘बळीचा बकरा’ का बनवला गेला, याचीही चौकशी होण्याची गरज आहे" असं ट्वीट सोनी राजदान यांनी केलं आहे.

अफझल गुरुच्या फाशीनंतर दविंदर सिंहला का सोडण्यात आलं याची चौकशी झाली पाहिजे. अफझलसारख्या लोकांवर कसा अत्याचार केला जातो आणि दहशतवादी कारवाया करण्यासाठी कसं भाग पाडलं जातं. यानंतर त्यांना फाशीची शिक्षा कशी मिळते याचीही चौकशी व्हायला हवी असंही सोनी राजदान यांनी लिहिलं आहे.

aalia bhattas mother soni  raajdaan took objection over Afzal gurus death penalty

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com