महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या ५४ रुग्णांमधील ३१ जण कोरोनामुक्त

आज 544 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, तर 515 रुग्ण कोरोनामुक्त
RT-PCR
RT-PCResakal

मुंबई : देशात एकीकडे कोरोनाचा (Corona New Variant) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने (Omicron Variant ) चिंता वाढवली असताना महाराष्ट्रासाठी मात्र आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. (Omicron Cases In Maharashtra) राज्यात आज एकाही नव्या ओमिक्रॉनची लागण झालेल्या रूग्णाची नोंद करण्यात आलेली नाही. सध्या राज्यात ओमिक्रॉनची लागण झालेल्या 54 रूग्ण आहेत. त्यापैकी 31 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहे. दरम्यान, आज 544 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 515 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर आज चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (No new Omicron case is reported in maharashtra state today)

राज्यात आतापर्यंत 64 लाख 98 हजार 015 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला असून राज्यात सध्या 7 हजार 093 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 81 हजार 661 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 877 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

RT-PCR
ओमिक्रॉनबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची संसदेत माहिती, म्हणाले...

देशात ओमिक्रॉनचे 161 रूग्ण

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरनाचा (Corona) नव्याने आढळलेला ओमिक्रॉन व्हेरिएंटने आता जगभरासाह भारतातदेखील आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या आता 161 च्या घरात पोहचली आहे. ओमिक्रॉन बाधित सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात (Maharashtra Omicron Cases) असून त्या खालोखाल राजधानी दिल्लीचा समावेश आहे. महाराष्ट्रात 54 तर दिल्लीत 32 जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे.

RT-PCR
अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; 54 दिवसांनंतर निघाला तोडगा

दरम्यान भारतातील ओमिक्रॉन (Omicron Cases Count In India) विषाणूचा संसर्ग होणाऱ्या रूग्णांची आकडेवारीत सातत्याने वाढ असून यामध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानावर आहे. देशात महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 54, दिल्लीत 32, तेलंगणा 20, राजस्थान 17, कर्नाटक 08, गुजरात 13, केरळ 11, आंध्र प्रदेश 01, चंदीगड 01, तामिळनाडू 01, पश्चिम बंगाल 01, उत्तर प्रदेश 02 रूग्ण आढळून आली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com