लोकं ऐकत नाही म्हणून आता 'या' शहरी भागात खासगी वाहनं चालवायला आता 'नो परमिशन'

लोकं ऐकत नाही म्हणून आता 'या' शहरी भागात खासगी वाहनं चालवायला आता 'नो परमिशन'

कल्याण-डोंबिवली शहरांत कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी पालिका प्रशासन व इतर यंत्रणा अनेक उपाययोजना करत आहेत. आता डोंबिवली पूर्व-पश्‍चिम परिसरात सार्वजनिक वाहतूक वगळता इतर हलकी व मध्यम आकाराची वाहने आणि सर्व प्रकारच्या तीन चाकी वाहनांना 1 एप्रिलपासून पुढे अनिश्‍चित काळासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.

डोंबिवली प्रभाग फ, ग, ह आणि ई क्षेत्रात नमूद केल्या वाहनांसह, दुचाकी व चारचाकी वाहनांना बुधवारी संध्याकाळी सहापासून प्रतिबंध घालण्यात आला आहे. अत्यावश्‍यक सेवा वाहने, जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक आणि कर्तव्यावर असणाऱ्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना हे नियम लागू होणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

पालघर तालुक्‍यात दुसरा रुग्ण 

पालघर तातुलक्‍यात सफाळेमधील एका 46 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. पालघरच्या ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कालपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजते. मात्र, त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. 

धारावीत आढळला कोरोना रुग्ण  

मुंबईतील धारावी झोपडपट्टीत नॉवेल कोरोना व्हायरसमुळे होणारा COVID19 चा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलाय. मुंबईतील धारावी झोपडपट्टी म्हणजे तीच झोपडपट्टी जिला आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखलं जातं. या झोपडपट्टीत अत्यंत दाटीवाटीच्या परीसर आहे आणि मुंबईतील सर्वात जास्त दाट लोकवस्ती असलेलं एक ठिकाण म्हणजे धारावी झोपडपट्टी. याच आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाल्याची बातमी आता समोर येतेय. 

no private vehicles are allowed on roads at kalyan and dombivali of mumbais MMR region 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com