esakal | दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेत कोणतीही भरती नाही, बँकेचे स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

bank

दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेत कोणतीही भरती नाही, बँकेचे स्पष्टीकरण

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या ‘दि म्युनिसिपल को. ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’ द्वारे प्रामुख्याने महानगरपालिका (BMC) कर्मचा-यांना बँकींग सुविधा दिली जाते. कर्मचारी सहकारी बँक गटातील आपल्या वर्गवारीत ही राज्यातील सर्वात मोठी कर्मचारी (Employee) सहकारी बँक आहे. या बँकेमध्ये भरती प्रक्रिया सुरु असल्याबद्दल दिशाभूल करणारी व खोटी माहिती विविध समाजमाध्यमांवर (media) प्रसारित होत आहे. बँकेमध्ये (Bank) कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया सध्या सुरु नाही असे ‘दि म्युनिसिपल को. ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’ द्वारे कळविण्यात आले आहे. ( No Vacancies there in Municipal Cooperative Bank - nss91)

हेही वाचा: देशमुखांनी CBI विरोधात केलेल्या याचिकेवर गुरुवारी निर्णय- HC

समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या खोट्या जाहिरातीमध्ये दि म्युनिसिपल को. ऑपरेटिव्ह बँकेमध्ये खुल्या प्रवर्गातील कॅशियर, शिपाई, शाखा व्यवस्थापक, व्यवस्थापक (आय.टी.), एएसटीटी, मॅनेजर (आय.टी.) आणि कार्यकारी सहाय्यक अशा विविध संख्येतील पदांकरीता भरती असल्याचे नमूद केले आहे. मात्र, सदर जाहिरात खोटी व दिशाभूल करणारी असून बँकेत भरती असल्यास बँकेच्या www.municipalbankmumbai.com या संकेतस्थळावर आणि अग्रगण्य वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात येते. मात्र, सध्या बँकेमध्ये कोणतीही भरती प्रक्रिया सुरु नसल्याचे बँकेद्वारे कळविण्यात आले आहे.

loading image