आता पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० लाखांची मदत मिळेलच असं नाही

आता पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० लाखांची मदत मिळेलच असं नाही

मुंबई : कोरोनामुळे आणि मृत्यू पश्चात पोलसांना मिळणाऱ्या कोरोना अनुदानाबाबतच्या एका निर्णयामुळे पोलिसदलात चांगलीच अस्वस्थता पाहायला मिळतेय. याला कारण ठरतंय ते म्हणजे सरकारने जारी केलेलं एक परिपत्रक.

सरकारने एक परिपत्रक जारी केलंय. यामध्ये कोरोनामुळे कुणा पोलिस कर्मचारी किंवा अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर मृत्यू पश्चात त्या पोलिस कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाखांचं अनुदान मिळेलंच असं नाही. या नव्या निर्णयामुळे RTO पोलिस, राज्य गुप्तवार्ता विभाग, लाचलुचपत विभाग यांच्यासह अन्य पोलिसांना कोरोना झाला तर त्यांनी करायचं काय? असा सवाल आता विचारला जातोय.  

काय आहेत नवीन नियम  : 

एखाद्या पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांनी रुग्णलयात दाखल होण्याआधी कोरोना संदर्भात १४ दिवसात ड्युटी केली असणं बंधनकारक आहे. तसं प्रमाणपत्र असेल तर आणि तरच त्या पोलिस कर्मचाऱ्याला पन्नास लाखांची मदत मिळू शकते.

जाचक अटी ताबडतोब काढा

पोलिसांवर लावलेल्या जाचक अटी ताबडतोब काढा, शिवसेनेची अशी भूमिका आहे. त्यामुळे पोलिसांवरील अटी मागे घेऊन सरसकट सर्व पोलिसांना विमा संरक्षण द्यायला हवं. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी ही भूमिका मांडली आहे. कर्तव्यावर असताना कोणत्याही पोलिसांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत देण्यात यावी अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केलीये. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतची माहिती दिली आहे.

not all the police workers will get 50 lakh as compensation if police dies due to covid 19

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com