सराफाचं नाही तर चोरट्याने लुटलं चक्क किराण्याचं दुकान; कॅडबरी, काजू बदाम, अगरबत्त्याही पळवल्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

लॉकडाऊनमध्ये आर्थिक स्रोत घटल्यामुळे जीवनावश्यक वस्तू चोरीला जाण्याचे प्रमाण आता वाढत असून सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांनी नाही तर आता किराणा मालाच्या व्यापाऱ्यांवरही सावध राहायची वेळ आली आहे. 

कल्याण : लॉकडाऊन मुळे मद्य, सिगारेट, दूध आदी गोष्टी चोरीला जाण्याच्या अनेक घटना  समोर आल्या आहेत. मात्र, कल्याण मध्ये एका अज्ञात चोराने संपूर्ण किराणा दुकानच लुटल्याची घटना घडली आहे.

नक्की वाचा : कौतुकास्पद! दोन महिन्यात तब्बल 10 हजार नागरिकांची तपासणी करणारा योद्धा; वाचा सविस्तर

लॉकडाऊनमध्ये आर्थिक स्रोत घटल्यामुळे जीवनावश्यक वस्तू चोरीला जाण्याचे प्रमाण आता वाढत असून सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांनी नाही तर आता किराणा मालाच्या व्यापाऱ्यांवरही सावध राहायची वेळ आली आहे. 

महत्वाची बातमी : कोरोना झाल्यास पोलिसांवर तातडीने उपचार होणार, महाराष्ट्र कुटूंब आरोग्य योजनेत कोव्हिडचा समावेश

कल्याण पूर्वेतील नांदीवली गाव परिसरात सुभाषचंद्र जैन यांचे किराणा मालाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून रात्रीच्या वेळेस दुकानात प्रवेश केला. यावेळी शीतपेय, साबण, सौंदर्य प्रसाधनाच्या क्रिम, अन्नधान्य असा एकूण 46 हजारांहून जास्त किंमतीचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. यात, तेल, महागडी शीतपेय, दही, कॅडबरी, काजू बदाम, गरम मसाल्याचे पदार्थ, डाळी, नारळ, खोबरा बर्फी, अगरबत्ती, गल्ल्यात ठेवलेले सुट्टे पैसे, इंटरनेटचे राऊटर, सीसीटीव्ही डीव्हायडर या वस्तूही चोराने चोरी केल्या. आपले किराणा दुकान लुटले आहे हे लक्षात येताच जैन यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. जैन यांच्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Not a bullion shop, but a grocery store; Cadbury, cashew nuts, incense sticks were also stolen


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not a bullion shop, but a grocery store; Cadbury, cashew nuts, incense sticks were also stolen