गुणपत्रिकेतेसंदर्भात शिक्षणमंत्र्यांचा अत्यंत महत्वाचा निर्णय... वाचा संपुर्ण बातमी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

  • गुणपत्रिकांवर आता श्रेणीसह टक्केवारीही 
  • व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशातील अडचण दूर 

मुंबई : राज्यातील विद्यापीठांच्या गुणपत्रिका वेगवेगळ्या नमुन्यांत देण्यात येतात. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवरही होत असल्याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना गुणपत्रिका एकाच नमुन्यात देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आता विद्यापीठांच्या गुणपत्रिकांवर श्रेणीसह (ग्रेड) टक्केवारीही द्यावी लागेल. 

जगभरातल्या खवय्यांसाठी पर्वणी! दुबई फुड फेस्टीवल 26 पासून सुरू

राज्यातील बिगरकृषी विद्यापीठांतून पदवी घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी अर्ज करतात. अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी सेलच्या माध्यमातून होतात. मागील वर्षी प्रवेश प्रक्रियेवेळी प्रत्येक विद्यापीठाची गुणपत्रिका वेगवेगळी असल्याने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात गोंधळ झाला होता. काही विद्यापीठांच्या गुणपत्रिकांवर केवळ श्रेणी दर्शवण्यात आली होती. त्यामुळे विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना टक्केवारी नमूद असलेली गुणपत्रिका मिळवण्यासाठी विद्यापीठात फेऱ्या माराव्या लागल्या होत्या. 

खुशखबर! पनवेलपासून आता थेट गोरेगाव पर्यंत लोकल सेवा

त्यामुळे आता राज्यातील विद्यापीठांनी एकाच नमुन्यात गुणपत्रिका देण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत यांनी दिले आहेत. या संदर्भात कुलगुरूंची बैठक घेऊन सूचना दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर "ग्रेड' व गुणांची टक्केवारी देणे अनिवार्य असेल. पदवी पूर्ण केल्यानंतर इतर ठिकाणी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारीही विद्यापीठांना घ्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now all the university's marksheet are in the same pattern