मुंबई : लवकरच नाफेड शेतकऱ्यांकडून शेतमाल थेट खरेदी करेल. प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था (पॅक्स) २४ प्रकारचे व्यवसाय करू शकतील. दहा वर्षात कृषी निर्यात, सेंद्रिय अन्न आणि दूध या क्षेत्रात अमूल, कृभको आणि नाफेड या महाकाय संस्था होतील. तसेच सहकार क्षेत्राची विमा कंपनीही स्थापन करू, असा सहकारामार्फत ग्रामीण भारताच्या समृद्धीचा आराखडा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज येथे मांडला.