Konkan Railway: आता कोकणकरांचे झटक्यात होणार बुकिंग; गणेशोत्सवानिमित्त रेल्वे प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय
Railway Reservation: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची मोठी संख्या पाहता ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडक्यांच्या संख्या गर्दीच्या काळात कमी पडत आहे. त्यामुळे आता खिडक्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
ठाणे : मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी शहरांमधून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक आहे. त्यात सध्याच्या घडीला ठाणे रेल्वे स्थानकात असलेल्या आरक्षण तिकीट खिडक्यांच्या संख्या गर्दीच्या काळात कमी पडत आहे.