esakal | 'आता कोरोनाकडे लक्ष देऊया : उद्धव ठाकरे'

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray and mamata banerjee
'आता कोरोनाकडे लक्ष देऊया : उद्धव ठाकरे'
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमुल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर ममता बॅनर्जींना देशभरातील नेत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ममता बॅनर्जींना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचवेळी आता कोरोनाकडे लक्ष देऊया असे म्हटले आहे.

हेही वाचा: ममता बॅनर्जींना चॅलेंज देणारे सुवेंदू अधिकारी आहेत तरी कोण?

"ममता बॅनर्जी या 'बंगाली' जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी प. बंगालच्या भूमीवर एकवटली."

हेही वाचा: नुसरत जहाँ यांनी ममता बॅनर्जींसाठी केलं खास टि्वट

"त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळविला. मी त्यांचे व हिंमतबाज प. बंगाली जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया" असे उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.