मुंबईत प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या तब्बल 'इतक्यानं' झाली कमी; महापालिकेची नवी आयडीया

containment zone
containment zone

मुंबई:  एका इमारतीमुळे संपुर्ण परीसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.फक्त संबंधित इमारत सिल करण्यात येणार आहे. तर या इमारतीत पोलिस आणि पालिका कर्मचारी तैनात करण्यात येणार नसून सर्व जबाबदारी सोसायटीच्या कार्यकारी मंडळावर सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या कमी झाली आहे. पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्राची नव्याने आखणी केली आहे.पुर्वी एका इमारतीत रुग्ण आढळला तरी तो मार्ग सिल केला जात होता.त्या मार्गावर पोलिस बळ पुरविण्या बरोबरच परीसराचे नियोजन करण्यासाठी पालिकेचा कर्मचारीही नियुक्त केले जात होता. मात्र आता एकच इमारत सिल करण्यात येणार आहे.

 परिसरातील एका पेक्षा जास्त इमारतीत इमारतीत कोरोनाचे रुग्ण आढळल्यास तो परीसर " प्रतिबंधित क्षेत्र' म्हणून जाहीर करण्यात येईल. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राची संख्या कमी झाली आहे. मुंबईत या आधी २ हजार ८०१ प्रतिबंधित क्षेत्र होते. मात्र ते आता ६६१ वर आले आहे. तर सील इमारती १ हजार ११० आहेत. 

सोसायट्यांना काय करावे लागणार:  

सीलबंद इमारतीच्या बाबत निर्धारित करण्यात आलेल्या समितीद्वारे स्थानिक किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, मेडिकल दुकान इत्यादींशी संपर्क साधून सोसायटीच्या गरजांनुसार वस्तूंची वा सामानाची मागणी नोंदवली जाणार आहे. 'ऑर्डर' दिलेल्या सामानाची किंवा वस्तूंची 'डिलिव्हरी' ही सोसायटीच्या 'एन्ट्री गेट'वर दुकानदारांद्वारे वा विक्रेत्यांद्वारे दिली जाणार आहे. त्यानंतर ऑर्डरनुसार सोसायटी सदस्याच्या दरवाज्यापर्यंत वस्तूची डिलिव्हरी करण्याची व्यवस्था ही सोसायटीच्या समिती द्वारे केली जाणार आहे.

सदर सोसायटीतील ज्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला 'क्वारंटाईन' करण्यात आले आहे, किंवा जी व्यक्ती बाधित असून जिला लक्षणे नसल्यामुळे घरच्या घरीच 'क्वारंटाईन' करण्यात आले आहे; अशा व्यक्तींच्या भ्रमणध्वनीमध्ये ' आरोग्य   सेतु ॲप' इन्स्टॉल करवून घेण्याची कार्यवाही करण्याबाबत समितीचा पुढाकार व सहकार्य अपेक्षित असेल. तसेच  आवश्यकतेनुसार औषधी व सामान 'क्वारंटाईन' करण्यात आलेल्या व्यक्तींच्या घराच्या दरवाजापर्यंत वेळेवर पोहोचतील याचे नियोजन आणि व्यवस्थापन संबंधित समिती सदस्यांनी करायचे आहे.

 त्याचबरोबर सदर सोसायटीतील एखाद्या व्यक्तीला 'कोरोना कोविड-१९'ची लक्षणे आढळून आल्यास त्याची माहिती महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्याची दक्षता देखील समिती सदस्यांनी घ्यावयाची आहे.

कोरोना बाधित रुग्णांसाठी काय: 

पॉझिटिव्ह व लक्षणे असणाऱ्या रुग्णांना आरोग्य केंद्रात अथवा रुग्णालयात  दाखल करण्यात येईल. डॉक्टरांच्या व पालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आणि रुग्णाच्या क्षमतेनुसार संबंधित रुग्णास खाजगी किंवा सार्वजनिक वैद्यकीय सुविधेत पाठविले जाईल. जेव्हा एखाद्या इमारतीमध्ये बाधित रुग्ण आढळून येईल, तेव्हा बाधित रुग्ण रहात असलेल्या सदनिकेची परिस्थिती शौचालयांची संख्या, इमारतीची परिस्थिती यादी बाबी लक्षात घेऊन इमारत किंवा इमारतीचा भाग सीलबंद म्हणून घोषित करण्यात येणार आहे. अशा इमारतींमध्ये प्रवेश करण्यावर व बाहेर जाण्यावर प्रतिबंध असणार आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार बाधित असणारे परंतु लक्षणें असणाऱ्या रुग्णांना घरच्या घरीच 'क्वारंटाईन' केले जाणार आहे. या रुग्णांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर ' आरोग्य  सेतु ॲप' इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. बाधित रुग्णांच्या घरातील व्यक्ती, शेजारपाजारच्या किंवा त्याच मजल्यावरील व्यक्ती, तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती यांना देखील घरच्या घरीच 'क्वारंटाईन' केले जाणार आहे. या अनुषंगाने शिक्का मारण्याची (स्टॅम्पिंग) करण्याची कार्यवाही महापालिके मार्फत  केली जाणार आहे. निकटच्या संपर्कातील 'क्वारंटाईन' करण्यात आलेल्या व्यक्तींना देखील त्यांच्या भ्रमणध्वनीवर 'आरोग्य सेतु ॲप' इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.


लक्षणे असलेले बाधित रुग्ण आणि घरच्या घरी 'क्वारंटाईन' करण्यात आलेल्या व्यक्ती, यांच्याद्वारे आणि आणि सोसायटीतील इतर सदस्य व रहिवाशांद्वारे संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन होत असल्याची खातरजमा समितीद्वारे वेळोवेळी करण्यात येईल. यामध्ये सोसायटीतील सर्व सदस्यांद्वारे 'फिजिकल डिस्टन्सिंग', मास्क वापरणे, काटेकोरपणे स्वच्छता पाळणे यासारख्या बाबींचा समावेश आहे. सोसायटी परिसरात कोणत्याही विक्रेत्यास, घरकाम करणाऱ्या व्यक्तीस, कपडे धुऊन देणाऱ्या व्यक्तीस किंवा इतर कोणतीही सेवा देणाऱ्या व्यक्तीस प्रवेश करण्यास मज्जाव असेल.

number of containment zones are reduced in mumbai BMC has applied  these new rules read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com