मुंबईत आणि उल्हासनगरमध्ये आणखी एक-एक कोरोना रुग्ण, महाराष्ट्राची आकडेवारी गेली ४९ वर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

मुंबई: भारतात दिवसेंदिवस कोरोनाची दहशत पसरत चालली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आता या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मुंबईत आणखी २ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. 

या दोन रुग्णांमध्ये एक महिला उल्हासनगर तर एक महिला मुंबईची आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४९ वर पोहोचली आहे. या दोन्ही कोरोना रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: "भोंगा वाजलाय,वॉर अगेन्स्ट व्हायरस सुरु"- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

उल्हासनगरमध्ये एका ४९ वर्षांच्या महिलेला कोरोना रुग्णाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. ही महिला दुबईहून प्रवास करून आली होती. विमानतळावर तिची तपासणी करण्यात आली असता या महिलेला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे या महिलेला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे आणि तिच्यावर उपचार सुरु आहेत. 

तसंच मुंबईतल्या एका २२ वर्षांच्या तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे. ही तरुणी ब्रिटनमधून आली होती. त्यामुळे तिच्यावरही विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ४९ वर पोहोचली आहे.  भारतात कोरोना रुग्णांची संख्या १७३ झाली आहे. 

हेही वाचा: कोरोनामुळे मुंबईत केवळ 'याच' दिवशी सुरु राहणार दुकानं; पाहा कोणत्या भागात कधी सुरु राहणार दुकानं 

दरम्यान आतापर्यंत कोरोनाचे जे रुग्ण आढळले आहेत ते इतर देशातून भारतात आले आहेत. अशा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या काही नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं देखील स्पष्ट झालं आहे. या दोघांच्या संपर्कातील नागरिकांची देखील आता कसून तपासणी केली जातेय. राज्य सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी योग्य ती सर्व पावलं उचलायला सुरुवात केली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरीच राहा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका असं आवाहन राज्य सरकारकडून  वारंवार केलं जातंय.  

number of corona patients increased in maharashtra read full story

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona patients increased in mumbai and ulhasnagar