esakal | थैमान ! राज्यात कोरोनाबाधितांचा आलेख चढताच, एकूण रुग्णसंख्या 40 हजार पार
sakal

बोलून बातमी शोधा

corona

मुंबईत 41, मालेगावात नऊ, पुण्यात सात, औरंगाबाद शहरात तीन, नवी मुंबईत दोन; तसेच पिंपरी-चिंचवड आणि सोलापूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

थैमान ! राज्यात कोरोनाबाधितांचा आलेख चढताच, एकूण रुग्णसंख्या 40 हजार पार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात कोव्हिड-19 विषाणूच्या 2345 नवीन रुग्णांची नोंद झाली; त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 41,642 झाली आहे. आतापर्यंत 1408 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एकूण 11,726 जण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील आणखी 64 रुग्ण दगावल्यामुळे कोव्हिडबळींचा आकडा 1454 वर पोहोचला आहे. दरम्यान, गुरुवारी मृत्यू झालेले सर्वाधिक 41 रुग्ण मुंबईतील होते.

नक्की वाचा : अतिहुशारपणाचा कळस ! सोसायटीत रंगली चक्क 'समोसा' पार्टी, मग पोलिसांनी....

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 41,642 झाली असून, 28,454 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत 41, मालेगावात नऊ, पुण्यात सात, औरंगाबाद शहरात तीन, नवी मुंबईत दोन; तसेच पिंपरी-चिंचवड आणि सोलापूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 36 पुरुष आणि 28 महिलांचा समावेश आहे. दगावलेल्यांपैकी 31 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील, 29 रुग्ण 40 ते 59 वयोगटातील आणि चार रुग्णण 40 वर्षांखालील होते. एकूण 38 जणांमध्ये (59 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार होते. कोव्हिड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1454 वर गेली आहे.

मोठी बातमी : कोविडचा सामना करण्यासाठी सरकारकडून जम्बो सुविधा केंद्राचा निर्णय...

आतापर्यंत...

  • तपासलेले नमुने : 3,19,710 
  • निगेटिव्ह : 2,78,068
  • पॉझिटिव्ह : 41,642 
  • क्लस्टर कंटेनमेंट झोन : 1949 
  • सर्वेक्षण पथके : 15,894
  • लोकसंख्येची पाहणी : 64.89 लाख
  • बरे झालेले रुग्ण :  11,726
  • होम क्वारंटाईन: 4,37,304
  • संस्थात्मक क्वारंटाईन : 26,865

number of corona sufferers is increasing in maharashtra, 2345 new patients

loading image