
मुंबई: लॉकडाऊनच्या काळात मुंबईच्या गतीला ब्रेक लागला असताना वाहन चोरीच्या गुन्ह्यांत दुपटीने वाढ झाल्याचे दिसून आले. याशिवाय एप्रिल महिन्यात सोनसाखळी चोरीचा एकही गुन्हा घडला नव्हता, पण मे मध्ये सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय विनयभंग, भांडणांचे गुन्ह्यांमध्ये वाढ पहायला मिळाली आहे. घरफोडीत मात्र घट झालेली पहायला मिळाली.
लॉकडाऊनच्या काळात मे महिन्यामधील वाहन चोरीची आकडेवारी पाहिली, तर प्रत्येक दिवसाला सरासरी पाच वाहनांची चोरी होत होती. मे महिन्यात मुंबईत वाहन चोरीप्रकरणी 158 गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात केवळ 84 वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले होते.
वाहन चोरीमधील 60 टक्क्यांहून अधिक गुन्हे दुचाकी चोरीचे आहेत. दुचाकी चोरून लवपणे सोपे जाते, तसेच हे चोरटे अगदी पाच हजार रुपयांनाही या दुचाकी विकतात. तसेच काहीवेळा त्याचे महत्त्वाचे भाग वेगळे करून विकले जातात. तसेच लॉकडाऊनच्या काळात दळणवळणाचे साधन नसल्यामुळेही लॉकडाऊनमध्ये वाहने चोरी झाल्याचा अंदाज एका अधिका-याने सांगितले.
याशिवाय हाणामारी व दंगलीच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाल्याचे दिसून आले. मे महिन्यात हाणारी व दंगलीचे 266 गुन्हे दाखल झाले आहेत, त्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात 148 गुन्हे दाखल झाले होते. हाणामारीच्या बहुसंख्य घटना झोपडपट्टी, चाळीत घडल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये गर्दी झाल्यामुळे किरकोळ कारणामुळे भांडण झाल्याचा प्रकार घडले असल्याचे अधिका-याने सांगितले.
मे महिन्यात विनयभंगाच्या प्रकरणांमध्येही एप्रिलच्या तुलनेत वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये 36 विनयभंगाचे गुन्हे घडले होते,त्याच्या तुलनेत मे महिन्यात 56 विनयभंगाचे प्रकार घडले. याशिवाय एप्रिल महिन्यात 17 बलात्काराचे गुन्हे घडले होते, मे महिन्यात बलात्काराचे 19 गुन्हे दाखल झाले. याशिवाय चोरीच्या गुन्ह्यातही 34 वरून 51 वर पोहोचले आहेत. याशिवाय मे महिन्यात महिन्यातही दरोड्याचा एक गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये दरोड्याचा एकही गुन्हा दाखल झाला नव्हता.
एप्रिल महिन्यात मुंबईत आठ हत्येचे गुन्हे दाखल झाले होते, मे महिन्यात 10 हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वाधीक गुन्हे संचारबंदी मोडल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत.
number of crimes have increased in mumbai during lockdown read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.