पत्नीच्या मृत्यूचा केला बनाव; मात्र पोलिसी खाक्या दिसताच दिली कबूली!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

रागाच्या भरात ढकलून दिल्यामुळे जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना कामोठ्यात घडली. दरम्यान, चक्कर येऊन पडल्यामुळे पत्नीच्या डोक्याला दुखापत झाल्याचा बहाणा करणाऱ्या पतीला अखेर कामोठे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय चैन्सिंग मंडराई (36) असे पतीचे नाव आहे.

नवी मुंबई : रागाच्या भरात ढकलून दिल्यामुळे जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना कामोठ्यात घडली. दरम्यान, चक्कर येऊन पडल्यामुळे पत्नीच्या डोक्याला दुखापत झाल्याचा बहाणा करणाऱ्या पतीला अखेर कामोठे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय चैन्सिंग मंडराई (36) असे पतीचे नाव आहे.

ही बातमी वाचली का? मुंबई आकाशवाणीवरील मराठीची गळचेपी थांबवा; प्रकाश जावडेकर यांना लिहिले पत्र 

आरोपी संजय मंडराई हा पत्नी सीमा (26) हिच्यासोबत कामोठे सेक्टर-14 मधील पावणेकर चाळीत राहत होता. 19 मे रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास संजय कामावरून आल्यानंतर त्याने पत्नीकडे जेवायला मागितले होते. यावरून वाद झाला. तिला किचनमध्ये ढकलून दिले होते. त्यामुळे ती गंभीर जखमी होऊन खाली पडली होती. अखेर उचारादरम्यान सीमाचा चार दिवसांनंतर मृत्यू झाला. 

ही बातमी वाचली का? मोठी बातमी - लवकरच रेमडेसिवीर औषधाच्या चाचण्या होणार सुरु...

संजय मंडराई याने पत्नी सीमा ही चक्कर येऊन किचनमध्ये पडल्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची खोटी माहिती कामोठे पोलिसांना दिली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीमाला तिच्या पतीने ढकलल्यामुळे ती पडल्याचे आढळून आले. पोलिसांनी संजय मंडराई याची चौकशी केल्यानंतर त्याने रागाच्या भरात ढकलल्यामुळे सीमाच्या डोक्याला किचनचा ओटा लागून ती गंभीर जखमी झाल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी संजय मंडराई याला पत्नीच्या मृत्यूला जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Regarding the death of his wife Husband in custody