'जी उत्तर' मधील रुग्णसंख्या 10 हजारांवर, मुंबईत आतापर्यंत 11,15,711 चाचण्या

'जी उत्तर' मधील रुग्णसंख्या 10 हजारांवर, मुंबईत आतापर्यंत 11,15,711 चाचण्या

मुंबई: कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढताना दिसतोय. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.  जी उत्तरमध्ये बुधवारी 110 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. धारावीमध्ये काल दिवसभरात 11 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 3176 इतकी झाली आहे. तर 187 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

दादरमध्ये बुधवारी 49 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 3,607 इतकी झाली आहे. तर 533 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. माहिममध्ये काल 50 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 3245 इतकी झाली आहे. तर 420 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात काल 110 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 10,028 वर पोहोचला आहे.  आतापर्यंत 554 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

धारावीमध्ये 2,700, दादरमध्ये 2,952 तर माहिममध्ये 2,711 असे एकूण 8,363 रुग्ण कोरोनामुक्त झालेत.  1,140 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबईत आतापर्यंत 11,15,711 चाचण्या

मुंबईत 29 सप्टेंबरपर्यंत एकूण 11,15,711  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.05  इतका आहे. बुधवारी 2,066 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत 1,69,268 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर वाढून 66 दिवसांवर गेला आहे. 

मुंबईत बुधवारी 2,654 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,05,142 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.05 टक्के इतका आहे. मुंबईत काल 46 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,926 वर पोहोचला आहे. मुंबईत काल 2,066 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 82 टक्के इतका झाला  आहे.  

मुंबईत बुधवारी नोंद झालेल्या 46 मृत्यूंपैकी 38 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 29 पुरुष तर 17 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 40 रुग्णांपैकी एकाचे वय 40 च्या खाली होते. 13 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 32 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. 

------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Number of patients G North 10 thousand  Mumbai 11 lakh 15 thousand 711 tests Done

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com