
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: कल्याण डोंबिवली महापालिकेने कचरा संकलन करण्याचा ठेका सुमित एल्कोप्लास्ट या कंपनीला दिला आहे. कचरा संकलनासाठी सुमित एल्कोप्लास्ट कंपनीकडून सुमारे 50 छोट्या गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. या नवीन गाड्या गेल्या दोन महिन्यांपासून केडीएमसी परिसरातील रस्त्यावर धावत आहेत. आरटीओ नोंदणी न करता, नंबर प्लेट नसलेल्या गाड्या तशाच रस्त्यावर बेकायदेशील धावत असल्याचा भांडाफोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कैलास सणस यांनी केला आहे.