esakal | गंभीर ! इतरांपेक्षा लठ्ठ लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, 'ही' आहेत कारणं...
sakal

बोलून बातमी शोधा

गंभीर ! इतरांपेक्षा लठ्ठ लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, 'ही' आहेत कारणं...

ज्येष्ठ नागरिकांपाठोपाठ आता जास्त वजन, लठ्ठपणा असलेल्या लोकांना ही कोरोनाचा धोका अधिक असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

गंभीर ! इतरांपेक्षा लठ्ठ लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, 'ही' आहेत कारणं...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - ज्येष्ठ नागरिकांपाठोपाठ आता जास्त वजन, लठ्ठपणा असलेल्या लोकांना ही कोरोनाचा धोका अधिक असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. आतापर्यंत अमेरिका, यूके, चीन या देशांमध्ये जे कोरोनाचे रुग्ण अतिदक्षता विभागापर्यंत पोहचले आहेत त्यापैकी 75 टक्के नागरिक हे अतिवजन आणि लठ्ठपणाने ग्रासले होते. त्यामूळे आता ज्येष्ठ नागरिक, दिर्गकालीन आजार आणि किडनी विकार असलेल्यां पाठोपाठ लठ्ठ व्यक्तींना ही कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. 

लठ्ठ व्यक्तींमध्ये 40 टक्के मृत्युचा धोका - 

अभ्यासानुसार, लठ्ठ (obese) व्यक्तींमध्ये कोरोना व्हायरसमुळे अधिक गुंतागुंत निर्माण होण्याची आणि त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांच्या कोव्हिड 19 बद्दल केलेलया अभ्यासातल्या निष्कर्षावरुन असा दावा केला गेला आहे की किंबहुना तसा अभ्यास केला आहे की, अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गामुळे आयसीयूत दाखल झालेल्यांपैकी 75 टक्के नागरिकांचे वजन हे जास्त होते. त्यामुळे, या देशांतील नागरिकांसाठी एक सूचना जारी करण्यात आली आहे की, ज्येष्ठ नागरिकांसह जास्त वजन असणार्यांची ही काळजी घ्यावी. शिवाय, ज्येष्ठ नागरिकांपाठोपाठ वजन जास्त आहे त्यांचा ही या नियमावलीत समावेश करण्याचा विचार या देशांचा विचार आहे. 

लॉकडाऊनमध्ये अजित पवारांकडून मोदी सरकारला 2 वेळा पत्र, केली 'ही' मागणी...

दरम्यान, दोन आठवड्यांपुर्वी युके मधील एनएचएस म्हणजेच नॅशनल हेल्थ सर्विसने केलेल्या दाव्यानुसार ही कोरोनाच्या मृत्यू आणि संसर्गात लठ्ठपणा हे देखील एक कारण आहे. त्यांनी केलेल्या संशोधनातून, ज्यांचा बीएमआय म्हणजेच बॉडी मास्क इंडेक्स हा जास्त असतो, त्यांचे वजन जास्त असते आणि ज्यांचे वजन जास्त आहे त्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे. 

युरोपियन देशांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण जास्त आहे. त्यामूळे, वेगवेगळया देशांमध्ये झालेल्या अभ्यासाच्या पुराव्यानुसार, लठ्ठ व्यक्तींना ओबेसिटी हा आजार असतो ज्याचे प्रमाण भारतात ही जास्त आहे. 

लठ्ठपणा म्हणजे काय? 

शरीराच्या तुलनेत बॉडी मास्क इंडेक्स हा जास्त असतो. त्याला लठ्ठपणा असं म्हणतात. ज्यांचा बीएमआय 19 ते 25 च्या दरम्यान असतो ती व्यक्ती सुदृढ असते. 25 ते 30 च्या दरम्यान ज्यांचा बीएमआय आहे ते अतीवजनाच्या कॅटेगरी मध्ये येतात. 30 ते 40 बीएमआय असणारी व्यक्ती ओबेसिटी कॅटेगरी मध्ये येते. तर, 35 च्या पुढे बीएमआय असणारे लोक दुसर्या आजारांनी ग्रस्त असतात. जसे की मधुमेह, ह्रदयाचे विकार, स्ट्रोक. त्यामुळे, 30 च्या पुढे बीएमआय असणार्या प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावी असं आवाहन तद्य डॉक्टर्स करतात. 

परप्रांतीयासाठी दिलासादायक बातमी, लवकरच मुंबईतून सुटू शकते विशेष ट्रेन!
 

भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती चांगली - 

इतर देशांच्या तुलनेत भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्याचा दावा तद्यांनी केला आहे. मात्र, लठ्ठ पणा असलेल्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते. अति ताण असल्यामूळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यासाठी व्यायाम, योगा आणि चांगला आहार घेणं गरजेचं आहे. 

रोगप्रतिकारशक्तीसाठी काय कराल ? 

व्यायाम, योगा आणि चांगला आहार हे रोगप्रतिकारशक्ती चांगली करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पालेभाज्या, फळ भाज्या , मासे, पाण्याचे सेवन हा आहार कोणत्याही आजारा पासून वाचण्यासाठी मदत करतो. त्यामूळे घरी बनवलेल्या जेवणाचे सेवन करावे. तसच घरच्या घरी व्यायाम, योगा करुन मनाची शांती राखता येऊ शकते.

obese people have more threat of catching corona virus read detail report

loading image