8 ऑक्टोबर जागतिक दृष्टी दिन विशेष, कोरोनामुळे दृष्टीदोष असणाऱ्या वृद्धांमध्‍ये एकटेपणाची भावना

8 ऑक्टोबर जागतिक दृष्टी दिन विशेष, कोरोनामुळे दृष्टीदोष असणाऱ्या वृद्धांमध्‍ये एकटेपणाची भावना

मुंबई: वर्ष 2050 पर्यंत भारतातील जवळपास 20 टक्‍के लोकांचे वय 60 वर्षांवर असण्‍याचा अंदाज आहे. वृद्ध व्‍यक्‍तींना सीव्‍हीडी, मधुमेह, कर्करोग, श्‍वसनविषयक आजार आणि रेटिनल आजार (डोळ्यांसंबंधित आजार) असे गंभीर आजार होण्‍याचा उच्‍च धोका असतो. त्यामुळे देशात कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा दृष्टीदोष असणाऱ्या वृद्धांमद्ये एकटेपणाची बावना बळावल्याचे समोर आले आहे.

जगातील अंध लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकसंख्या भारतात आहे. डोळ्यांच्या आजारांचे बहुतेक सामान्य प्रकार म्हणजे मोतीबिंदू, काचबिंदू आणि रेटिना आजार हे आहेत. योग्य वेळी निदान आणि उपचार न केल्यास या आजारांमुळे संपूर्ण अंधत्व येऊ शकते. भारतातील जवळ-जवळ 35 टक्‍के वृद्धांना कोणत्‍या-ना-कोणत्या प्रकारचा दृष्टिदोष आहे.

वृद्धांमध्‍ये अंधत्‍व येण्‍याचे प्रमुख कारण म्‍हणजे एज-रिलेटेड मॅक्‍युलर डिजनरेशन (एएमडी) सारखा रेटिनल आजार. हा आजार झपाट्याने वाढत जातो आणि पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. एएमडी हा आजार नेत्रपटलाच्‍या मध्‍यभागी असलेल्‍या असामान्‍य रक्‍तवाहिन्‍यांच्‍या वाढीमुळे होतो. कोविड-19 आणि त्‍यामुळे करण्‍यात आलेले लॉकडाऊन नियम/ निर्बंध गंभीर आजार किंवा अधू दृष्‍टीने पीडित ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी अत्‍यंत आव्‍हानात्‍मक ठरले आहेत.

भारतातील दर दुसरी वृद्ध व्‍यक्ती त्‍यांची मुले किंवा नातेवाईक वेगळे राहत असल्‍यामुळे त्‍यांच्या वृद्ध पती/पत्‍नीसोबत राहत आहेत. परिणामत: त्‍यांना लॉकडाऊन दरम्‍यान दूर ठेवण्‍यात आले असून ते कोराना विषाणूचा संसर्ग होण्‍याच्‍या भीतीसह राहत आहेत. वृद्धांच्‍या या स्थितीबाबत बोलताना एजवेल फाऊंडेशनचे संस्‍थापकीय अध्‍यक्ष हिमांशू राथ म्‍हणाले, ''गेले काही महिने प्रत्‍येकासाठी अत्‍यंत अवघड राहिले आहेत, पण आपल्‍या ज्‍येष्‍ठ नागरिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. 

अंध किंवा अधू दृष्‍टी असलेल्‍या वृद्धांसाठी जीवन खडतर राहिले आहे. अधू दृष्‍टीमुळे अधिक करून स्‍पर्श आणि जाणीव यांवर अवलंबून राहावे लागते. स्‍पर्श किंवा आधार घेण्‍याचे ज्ञान नसल्‍यास किराणा मालांची खरेदी किंवा रस्‍ता ओलांडण्‍यासारखी साधीसोपी कामे त्‍यांच्‍यासाठी अवघड बनतात. ये-जा किंवा हालचाल करण्‍यासंदर्भातील गंभीर आव्‍हाने ते एकटेपणा आणि नैराश्‍याचा सामना करण्‍यापर्यंत कोविड-19 काळ पूर्णपणे किंवा अंशत: अंध असलेल्‍या वृद्धांना एखाद्या शिक्षेसमान ठरत आहे, असे मुंबईतील बॉम्‍बे हॉस्पिटलचे ऑफ्थॅलेमो‍लॉजिस्‍ट आणि आय अॅण्‍ड विट्रेओरेटिनल सर्जन आणि मुंबई रेटिना सेंटरचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय दुदानी यांनी सांगितले.

मागील अभ्‍यासांमधून निदर्शनास आले आहे की, एएमडीने पीडित वृद्ध रूग्‍णांमध्‍ये इतर डोळ्यांचे आजार असलेल्‍या रूग्‍णांच्‍या तुलनेत उदासीनता निर्माण होण्‍याचा उच्‍च धोका आहे. जवळपास एक-तृतीयांश दृष्‍टीहीन एएमडी रूग्‍णांमध्‍ये उदासीनता आढळून आली आहे. हे प्रमाण सामान्‍य दृष्‍टीहीन लोकांमध्‍ये असलेल्‍या प्रमाणाच्‍या तुलनेत दुप्‍पट आहे.

-------------------------

(संपादनः पूजा विचारे)

October 8 World Vision Day loneliness among visually impaired due corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com