esakal | ऑनलाईनच्या नावाखाली ऑफलाईन प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ऑनलाईनच्या नावाखाली ऑफलाईन प्रवेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून राज्यात काही ठराविक महापालिका (Municipal) क्षेत्रात करण्यात येत असलेले अकरावीचे ऑनलाईन (Online) प्रवेश हे केवळ धुळफेक आहे. या प्रवेशाच्या नावाखाली ऑफलाईन (Offline) प्रवेशाचा बाजार मांडला जात आहे. त्यामुळे पैसे मोजण्याची ऐपत असलेल्यांना वाट्टेल त्या ठिकाणी प्रवेश; तर गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांवर मात्र अन्याय होत आहे, असे "केपीएमजी" (KPMG) संस्थेने केलेल्या लेखापरीक्षणातून समोर आले आहे. शिक्षण (Education) विभागाने केपीएमजी (KPMG) संस्थेला अकरावीच्या प्रवेश प्रणालीचे लेखापरीक्षण करण्याचे निर्देश दिले होते.

या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रवेश देण्यासाठी असणारे निकष व ऑनलाईन प्रवेश देताना वापरण्यात आलेली पद्धती यामध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवण्यासाठी विविध प्रकारच्या पळवाटा शोधल्या जात असल्याचे ऑनलाईनच्या नावाखाली ऑफलाईन प्रवेश अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाचा गोंधळ अधिकारी वर्गांमुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयातील प्रवेशानुसार या प्रक्रियेचे ऑडीट करून पारदर्शकता आणावी.

सॉफ्टवेअरचा वापर टाळला!

सॉफ्टवेअर तयार करून प्रवेश प्रक्रिया राबविल्यास राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळतील. शिवाय ही प्रवेश प्रक्रिया जास्तीत जास्त ५० रूपयांत होऊ शकते. परंतु त्यात प्रवेश समिती आणि गैरमार्गातील प्रवेश करता येणार नसल्याने हे प्रवेश सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केले जात नसल्याचा आरोप सिस्कॉमने केला आहे.

हेही वाचा: शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी मुलाखतीसह भरती प्रक्रिया सुरू

सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत गुणवतेलाच वाव दिला जात आहे. त्यात काहीही गैरप्रकार समोर आलेले नाहीत. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय हा शासनस्तरावरचा आहे. त्यामुळे यावर काही सांगता येणार नाही. - दत्तात्रय जगताप, शिक्षण संचालक

• नागो गाणार, शिक्षक आमदार

loading image
go to top