धक्कादायक! वांद्र्यात 78 वर्षीय वृद्धाला चाकूचा धाक दाखवून लुटलं..

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

शुक्रवारी सकाळी वांद्रे येथील घराबाहेर पडले त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत लुटलं.

मुंबई- वांद्रे परिसरात 78 वर्षीय वृद्धाला लुटल्याची घटना घडली आहे. चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी 400 रुपये आणि सोन्याची अंगठी लुटली. ही सोन्याची अंगठी जवळपास 30 हजार रुपयांच्या आसपास होती. जेव्हा शुक्रवारी सकाळी वांद्रे येथील घराबाहेर पडले त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत लुटलं.

हेही वाचा: खबरदार..! मास्क न घालता घराबाहेर पडलात तर...

टाटा ब्लॉक्समधील रहिवासी, वाहतूक सल्लागार धनजी पटेल हे सकाळी 9.30 च्या सुमारास एस व्ही रोड ट्रॅफिक वॉर्डनला भेट देण्यासाठी जात असताना ही घटना घडली. कॉलनी गेटजवळ, मास्क घातलेल्या व्यक्तीने त्याला रोखलं. चोरट्यानं त्यांना विचारलं की, "काका, कसे आहात?" मी त्याला ओळखतो असे मला वाटत नव्हते. त्यात त्यानं मास्क घातला होता त्यामुळे त्याला ओळखू शकलो नाही.

मी चालण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मला थांबवले आणि माझा चष्मा काढून घेतला. चोरट्यानं माझ्या पोटावर चाकू ठेवला. मला इशारा दिला की, माझे साथीदार तुम्हाला पाहात असल्याने आरडाओरड करण्याचा प्रयत्न करु नका. आणखी एकजण दुचाकीवर आला आणि त्याने मला लुटले, असे पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा: कसा साजरा होणार गणेशोत्सव; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

पटेल म्हणाले की, हा परिसर आयसोलेटेट आहे. त्यामुळे गुन्हेगारांना लुटण्यात मदत झाली. या घटनेप्रकरणी पटेल यांनी वांद्रे पोलिसांशी संपर्क साधला. दुचाकी आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करु, असं पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं.

old man in bandra looted by man  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old man in bandra looted by man