भायखळा, माहिम, वडाळा परीसरातील नागरिक सुखावणार, पाणीबाणी संपणार

भायखळा, माहिम, वडाळा परीसरातील नागरिक सुखावणार, पाणीबाणी संपणार

मुंबई, ता. 23 : भायखळा माहिम आणि वडाळा परीसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहीन्या बदलून नव्या जलवाहीन्या टाकण्यात येणार आहेत. या जलवाहीन्या रेल्वे मार्गातून येत असल्याने रेल्वे सुरुक्षा आयुक्तांच्या विविध परवानग्या मिळवण्यासाठी महापालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे. यासाठी 3 कोटी 88 लाख रुपये खर्च करणार आहे. 

भायखळा वडाळा माहिम या भागातील रेल्वे मार्गातून ब्रिटीश कालीन जलवाहीन्या जाणार आहेत. नव्या जलवाहीन्या टाकण्यासाठी खोदकाम न करता सुक्ष्म बोगदा तंत्रज्ञान वापरुन या जलवाहीन्या बदलण्यात येत आहे. त्याचबरोबर भायखळा येथील पुलावरुन जाणारी जलवाहीनीही बदलण्यात येणार आहे. या जलवाहीन्या बदलताना नव्या जलवाहीन्या जास्त व्यासाच्या टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्यात सुधारणा होईल असा दावा पालिका प्रशासनाने केला. हे काम रेल्वे मार्गातून होणे गरजेचे असल्याने रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी घेण्याबरोबरच कामाचा आराखडा करणे, कामाचे पर्यवेक्षण करणे, यासाठी महापालिकेने योलेक्‍स इन्फ्रा एनर्जी प्रथा या सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

असे होणार काम 

माहीम स्थानकातील रेल्वे रुळाखालून जाणारी 900 मिमी जलवाहिनी बदलून 1200 मिमी व्यासाच्या दोन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. तर वडाळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पुलाला जोडणाऱ्या रफि अहमद किडवाई नगर ते शेख मिस्त्री मार्ग येथे सुक्ष्म बोगदा तंत्राने 900मिमी  व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येईल. भायखळा येथील नेस्बीट पुलावर आधारित असणारी 1200 मिमी व्यासाची जलवाहिनी बदलत त्याठिकाणी 1500 मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

old waterlines will be changed byculla mahim and wadala citizens will get ample of water

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com