Onboard Flight Lighting Beedi: पठ्ठ्यानं विमानातच पेटवली बिडी! मुंबई पोलिसांनी चांगलीच घडवली अद्दल

या प्रकारामुळं एकच गोंधळ उडाला याची दखल थेट पोलिसांनी घेतली.
Onboard Flight Lighting Beedi
Onboard Flight Lighting Beedi
Updated on

मुंबई : विमानात एका प्रवाशानं चक्क बीडी ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळं एकच गोंधळ उडाला याची दखल थेट पोलिसांनी घेतली. यानंतर पोलिसांनी या प्रवाशाला ताब्यात घेतलं आणि गुन्हा दाखल केल्यानंतर कोर्टात हजर केलं. कोर्टानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (onboard flight lighting beedi by a man mumbai police arrest him and sent to judicial custody)

एएनआयच्या माहितीनुसार, मोहम्मद फकरुद्दीन मोहम्मद अमरुद्दीन (वय ४२) असं या प्रवाशाचं नाव असून त्यानं मुंबईहून उड्डाण करणाऱ्या विमानात बिडी शिलगावली. अशा प्रकारे विमानात सिगारेट किंवा बिडीच नव्हे तर कुठलंही लाईटर किंवा काडेपेटी सारखं ज्वलनशील पदार्थ नेण्यास बंदी असतानाही हा प्रकार घडल्यानं एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

Onboard Flight Lighting Beedi
Israel Hamas War: इस्रायलमधील भारतीयांसाठी भारत सरकारनं काढली अॅडव्हायजरी; दिला 'हा' महत्वाचा सल्ला

दरम्यान, मुंबईच्या सहार पोलिसांनी या प्रवाशाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर भादंवि ३३६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एअरक्राफ्ट अॅक्ट अंतर्गत संबंधित गुन्हाही त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. यानंतर आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girgaon Prostitution Case 2 actress involved
Zinc Phosphide Seized
Satavahana Era Relics Found in Junnar Shed Light on Ancient Trade and Culture
Solapur Airport to Mumbai Flights Begin September 1, Booking Now Live
Marathi News Esakal
www.esakal.com