esakal | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी आनंदाची बातमी; मुंबईतील 'हा' रेड झोन आता ग्रीन झोनच्या मार्गावर...
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी आनंदाची बातमी; मुंबईतील 'हा' रेड झोन आता ग्रीन झोनच्या मार्गावर...

बेहरामपाडा, भारतनगर, खेरवाडी, गोळीबार नगर असा वांद्रे ते सांताक्रूझ पर्यंतचा झोपडपट्टी परिसर आहे. दाटीवाटीने वसलेल्या बैठ्या इमारती आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी आनंदाची बातमी; मुंबईतील 'हा' रेड झोन आता ग्रीन झोनच्या मार्गावर...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - संपूर्ण सांताक्रुझ विभाग रेड झोनमध्ये होता. मात्र चतुःसूत्रीच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्याने  रुग्णवाढीचा दर आता १ टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७६ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे सांताक्रुझ विभाग मुंबईत पहिल्या नंबरवर आल्याचे दिसून येत आहे. 

सांताक्रुझ विभागात कोरोनाच्या उपाययोजनांना यश आले आहे. या विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांनी कोरोना विरोधातील लढाईचे नियोजन चांगले केले. त्यांनी चतुःसूत्री तयार केली. त्यामुळेच येथे कोरोना आटोक्यात येत आहे. सूचनांचे पालन, कोरोनाबाधित असलेल्या भागाची संपूर्ण टाळेबंदी, कोरोनाबाधितांना सीसीसी-२ मध्ये आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना सीसीसी-१ मध्ये विलगीकरण कक्षात ठेवणे, दररोज रात्री ७ नंतर दिवसभराचा आढावा व दुसऱ्या दिवसाचे नियोजन याच चतुःसूत्रीची अंमलबजावणी करण्यात आली. 

मोठी बातमी : धनंजय मुंडे यांना झालेल्या कोरोनाबद्दल मोठी अपडेट, डॉक्टर म्हणालेत...

बेहरामपाडा, भारतनगर, खेरवाडी, गोळीबार नगर असा वांद्रे ते सांताक्रूझ पर्यंतचा झोपडपट्टी परिसर आहे. दाटीवाटीने वसलेल्या बैठ्या इमारती आहेत. मात्र प्रत्येक गल्ली पिंजून काढत प्रत्येक नागरिकाची तापमानदर्शक तपासणी करण्यात आली. परिसरातील शौचालयांचे  निर्जंतुकीकरण करण्यात आले. परिसरातील मार्केट पूर्णपणे बंद करण्यात आले. कंटेनमेंट झोनची पोलिसांच्या मदतीने पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आली. या सर्व कारवाईचा दृश्य परिणाम दिसू लागला आहे.

सांताक्रुझ विभागातील रुग्णांची संख्या ९५ पर्यंत गेली होती. ती आता २० पर्यंत खाली आली आहे. केंद्रीय निरिक्षण पथकाने या विभागाचा ३ वेळा दौरा केला होता.  या भागात १८ जूनपर्यंत एकूण  २६०७ इतकी रुग्णसंख्या होती. त्यामध्ये ४४७ तेथे न राहणारी रुग्णसंख्या आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग १० दिवस इतका होता. संपूर्ण सांताक्रुझ विभाग रेड झोनमध्ये आला होता. मात्र चतुःसूत्रीमुळे रुग्णवाढीचा दर आता १ टक्के आहे आणि रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७६ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे सांताक्रुझ विभाग पहिल्या नंबरवर आहे.

मोठी बातमी : कोरोनावर आलेल्या १०३ रुपयांच्या 'फॅबि-फ्लू' या गोळीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती...

रेड झोन वांद्रेही आटोक्यात

वांद्रे भागातही कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे आहेत. सध्या तरी या भागातील डबलिंग रेट ७६ दिवसांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे वांद्रे विभागातील कोरोनाविरोधातील उपाययोजनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भागातील अधिकाऱ्यांना परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याचे देण्यात आल्याचा फायदा झाल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान याच भागात असल्याने यंत्रणा जोरात कामाला लागल्याचे दिसते.

once a red zone turning into green zone good news coming from santacruz mumbai

loading image