एकेकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत "एन 95" मास्क विक्री बंद

एकेकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत "एन 95" मास्क विक्री बंद

मुंबई: कोरोना पासून बचाव करण्याकरिता सरकारनं तोंडाला 'मास्क' लावण्याचा नियमच बनवला आहे. 'एन 95' मास्क महाग मिळत होता. चांगल्या प्रतीचा मास्क असूनही परवडत नसल्याने अनेकजण इच्छा असूनही 'एन 95' हा मास्क खरेदी करू शकत नव्हते. त्यातच या मास्कची अव्वाच्या सव्वा भावाला विक्री केली जात होती. त्याची दखल घेत सरकारनं 'एन 95' मास्कच्या किंमतीवर नियंत्रण आणले आहे. त्यानुसार मेडिकल दुकानात सरकारच्या दरानुसार 'एन 95' मास्कची विक्री होणे अपेक्षित आहे. मात्र, धारावीत मेडिकल दुकानात 'एन 95' मास्क विकलाच नसल्याचे पुढे आले आहे. यासंदर्भात मेडिकल दुकानात विचारणा केली असता दुकानदारांनी धारावीसारख्या विभागात एवढा महाग मास्क कुणी घेत नाही. म्हणून आम्ही साधेच मास्क विक्रीस ठेवले आहेत. तर काही दुकानदारांनी सरकारने किंमती कमी केल्याने सध्या या मास्कचा पुरवठाच होत नसल्याचे सांगितले. 

राज्य सरकारच्या निर्णयानुसार मेडिकल दुकानाच्या दर्शनी भागात 'एन 95' मास्कच्या किंमतीची यादी लावण्याचा नियम केला आहे. पण धारावीत कोणत्याही मेडिकल दुकानात अशी यादी लावली नसल्याचे आढळून आले.

यासंदर्भात बोलताना स्थानिक रहिवासी सचिन चौगुले यांनी धारावीत "एन 95" या मास्कची विक्रीच होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आम्हाला हा मास्क धारावीच्या बाहेरून खरेदी करावा लागत असल्याचे चौगुले यांनी दैनिक 'सकाळ'शी बोलताना सांगितले. धारावीत 'एन 95' मास्क उपलब्ध नसल्याबद्दल धारावीत संताप व्यक्त केला जात आहे. सरकारनं याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.

--------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

once upon hotspot Dharavi stopped selling N95 masks

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com