हे गंभीर आहे ! कोरोनामुक्त झाल्यानंतरही घ्या काळजी, कारण कोरोनामुळे शरीरावर होतो विपरीत परिणाम?

हे गंभीर आहे ! कोरोनामुक्त झाल्यानंतरही घ्या काळजी, कारण कोरोनामुळे शरीरावर होतो विपरीत परिणाम?

मुंबई : कोरोना आजारातून बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी जे रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत त्यांच्या शरीरात विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडी तयार होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्णालयातून घरी गेल्यानंतरही रुग्णांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कोरोना संसर्गाने बाधित रुग्णाने व्यसनापासून लांब राहणे गरजेचे आहे. अल्कोहोल पासून लांब असणाऱ्या रुग्णांना या आजारातून वाचवणे शक्य असते. याशिवाय आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे गरजेचे असून सकस आहार घेणे महत्वाचे आहे. कोरोना संसर्ग केवळ फुफ्फुसावरच नाही तर संपूर्ण शरीरावर परिणाम करत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कोरोना संसर्ग यकृतावर देखील परिणाम करू शकतो. त्यामुळे फुफ्फुस देखील आकुंचन पाऊ शकते. त्यामुळे फुफ्फुसासाठी आवश्यक व्यायाम करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम केल्याने शरीराला आवश्यक ऑक्सिजन पुरवठा योग्य प्रमाणात होण्यास मदत होते. अश्या लोकांनी गर्दीची ठिकाणे तसेच सार्वजनिक ठिकाणी फिरणे टाळावे.

प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात आवश्यक अँटीबॉडीज तयार होतीलच असे नाही. अश्या परिस्थितीत व्यक्ती पुन्हा एकदा संक्रमित होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे कोरोना आजारातून मुक्त झालेल्या रुग्णांना मास्क घालणे, योग्य शारीरिक अंतर राखणे तसेच आपल्या आहाराकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे.

कोरोना बाधित रुग्ण बरा होऊन घरी आल्यानंतर त्यांना पुन्हा कोरोना होणार नाही असे एखाद्याला वाटत असेल तर ते चुकीचे ठरेल. त्यांना स्वतःसाठी तसेच इतरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनातून बरे झालेले रुग्ण पुन्हा बाधित होत असल्याचे अनेक देशांमध्ये समोर आले आहे.

कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आला तर रुग्ण कोरोना विषाणूपासून पूर्णतः मुक्त झाला असे नाही. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर देखील शरीरात विषाणूंचे अस्तित्व असते. त्यामुळे रुग्णांना सकस आहार घेणे, आवश्यक व्यायामावर भर देणे तसेच आराम करणे महत्वाचे आहे.

( संकलन - सुमित बागुल )

once you are covid negative dont take it lightly check after effects of covid on human body 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com