'ते' हेल्मेट घातलं की मिनिटाला होते २०० जणांची तपासणी, कोविड सस्क्रीनिंगसाठीचा 'कमाल' पर्याय...

समीर सुर्वे
Saturday, 18 July 2020

मिनीटाला 200 नागरीकांचा उष्मांक मोजला जाणारे 'स्मार्ट हॅल्मेट' वापरुन पश्चिम उपनगरात नागरीकांचे स्किनींग केले जात आहे.

मुंबई : मिनीटाला 200 नागरीकांचा उष्मांक मोजला जाणारे 'स्मार्ट हॅल्मेट' वापरुन पश्चिम उपनगरात नागरीकांचे स्किनींग केले जात आहे. या हॅल्मेटच्या मदतीने एका मिनीटात 200 नागरीकांचाा उष्णांक मोजला जातो. त्यामुळे प्रतिबंधात्मक तपासणी वेगाने होत आहे .

मग हॅल्मेट परीधान केलेली व्यक्ती त्या विभागात फिरते :

मालाड आणि दहिसरच्या वस्त्यांमधिल 10 हजार नागरीकांच्या तपासणीसाठी हे हेल्मेट वापरण्यात आले आले आहे. पुर्वी थर्मल गनचा वापर करुन नागरीकांचा उष्णांक मोजला जात होता. आता या स्मार्ट हॅल्मेटचा वापर केला जात आहे. या स्मार्ट हॅल्मेटवर एक सेन्सर असून तो एका स्मार्ट वॉचला जोडलाा आहे. एखाद्या व्यक्तीचा उष्णांक जास्त असल्यास तत्काळ स्मार्ट वॉच मध्ये दर्शवले जाते. तपासणी करण्यापुर्वी पालिकेचे आरोग्य सेवक वस्त्यांमधिल नागरीकांना घरा बाहेर आणून उभे करतात मग हॅल्मेट परीधान केलेली व्यक्ती त्या विभागात फिरते.

मोठी बातमी मुंबईकरांना दमदार पावसाची अजूनही प्रतिक्षाच; धरणांतील पाणीसाठ्यात पुरेशी वाढ नाहीच

सहा लाख रुपयांचं आहे एक हॅल्मेट

सहा लाख रुपयांचे हे एक हॅल्मेट आहे. मुंबई उपनगरात कोविडचा संसर्ग वाढू लागल्यावर 22 जून रोजी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मिशन झिरो मोहिम सुरु केली होती. भारतीय जैन संघटने बरोबरच विविध संघटनांच्या मदतीने कोविड हॉटस्पॉट असलेल्या विभागांमध्ये नागरीकांची तपासणी केली जात आहे. त्यातील संशयीत नागरीकांची चाचणी करुन कोविड रुग्णांवर तत्काळ उपचार सुरु करण्यात येत आहे. भारतीय जैन संघटनेने असे दोन हॅल्मेट पालिकेला उपलब्ध करुन दिले आहेत.

मोठी बातमी - रायगड जिल्हातील पावसाने शेतकरी वर्ग सुखावला; भातलावणीच्या कामांना वेग

मासस्क्रीनिंगसाठी या हॅल्मेटचा चांगला वापर

मासस्क्रीनिंगसाठी या हॅल्मेटचा चांगला वापर होत आहे. आठवडाभरात प्रतिबंधीत क्षेत्रातील 13 ते 14 हजार नागरीकांचे स्र्किनीग करण्यात आले आहे. असे भारतीय जैन संघटनेच्या समन्वयक डॉ. निलू जैन यांनी सांगितले.

( संकलन - सुमित बागुल )

smart way of screening for covid19 bmc is using smart helmets which screens 200 people in minute


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smart way of screening for covid19 bmc is using smart helmets which screens 200 people in minute