कोरोना रुग्ण आढळल्याने रायगड जिल्ह्यातील 'हे' शहर अर्ध सील

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

रविवारी (ता.26) रात्री आलेल्या अहवालावरून खोपोलीत शहरातील एका 62 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर येथील नगरपालिका व पोलिस प्रशासनाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून अर्धे खोपोली शहर सील केले आहे.

खोपोली : रविवारी (ता.26) रात्री आलेल्या अहवालावरून खोपोलीत शहरातील एका 62 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर येथील नगरपालिका व पोलिस प्रशासनाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून अर्धे खोपोली शहर सील केले आहे.

हे ही वाचा : मनसे नेते अमित ठाकरेंचा डॉक्टरांसाठी पुढाकार, 1000 पीपीई किट्सचा मार्डला पुरवठा

या घटनेनंतर आता खोपोली नगरपालिका व पोलिस यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. पालिका प्रशासनाने रविवारी रात्री कोरोनाबाधित रुग्णाच्या घराजवळील व त्याच्या आजूबाजूचे तीन प्रभाग पूर्णपणे सील केले असून, जागोजागी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या क्षेत्रात औषधी दुकाने सोडून अन्य सर्व व्यवहार बंद केले आहेत. या भागातील सर्व नागरिकांना सक्तीचे होम कॉरंनटाईन राहण्याचे आवाहन पोलिस व नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मोठी बातमी '८ डिसेंबर 2020 ला संपूर्ण जग होणार COVID19 मुक्त; भारताची तारीख आहे २०...

बाधित रुग्णाच्या घराजवळील परिसर सील
गत आठवड्यात पनवेल येथील अष्टविनायक रुग्णालयात उपचारार्थ दाखल मुलीला भेटायला गेल्यावर संबंधित महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. ही महिला खोपोलीतील रहिवासी संकुल व मोठी वर्दळ असलेल्या रहिवासी भागात वास्तव्यास असून,  सध्या तिला उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले.

one corona positive patient in khopoli, city seal

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one corona positive patient in khopoli, city seal