esakal | एक कोटी ४५ लाखांची चोरीची वाहने जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

एक कोटी ४५ लाखांची चोरीची वाहने जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : वाहने भाडेतत्त्वावर लावण्याच्या बहाण्याने घेऊन सदर वाहने परस्पर विकणाऱ्या त्रिकुटापैकी एकाला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. वैभव अनंता कोळी (३५) असे त्याचे नाव असून त्याने दोन साथीदाराच्या मदतीने परस्पर विकलेली १ कोटी ३६ लाख ४५ हजार रुपये किमतीची ११ वाहने कोपरखैरणे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त विपिनकुमार सिंह यांनी दिली.

या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर दोघांचा शोध घेण्यात येत आहे. वैभव कोळी हा भाडेतत्त्वावर वाहने लावत असल्याची माहिती कारचालक मालकांना मिळाल्याने अनेकांनी आपल्या महागड्या कार त्याच्याकडे भाडेतत्त्वावर लावण्यासाठी दिल्या होत्या. मात्र कोळीने ती वाहने परस्पर काही लोकांना विकली. तर काही वाहने त्याने साउद कलदने व आशीष मेमन या दोघांना भाडेतत्त्वावर लावण्यासाठी दिल्या होत्या.

हेही वाचा: ..‘त्यांनी’ थांबवलं, थोडी भीती वाटली!

त्यांनी देखील कार परस्पर विकून अपहार केला. फसवणूक झालेल्या एकाने कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रारदार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तिदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष चौधरी यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून वैभव कोळीला अटक केली. चौकशीत त्याने इतर ११ व्यक्तींची वाहने देखील भाडेतत्त्वावर लावण्यासाठी घेतल्याचे कबूल केले.

loading image
go to top